अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल: आरोपी फरार
श्रीपुर: येथील आठ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सागर तानाजी चव्हाण (वय 26, रा. गणेशनगर, श्रीपुर) याच्यावर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाच सहा आपल्या घरी टीव्ही पहाण्याचा बाहाणा करून तिला बोलवून त्याने हा प्रकार केला.
यापूर्वीही आरोपीने असा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले . आरोपी सागराची पत्नी आठ दिवसांपूर्वीच माहेरी गेली आहे. ही संधी साधून त्याने हा प्रकार केला.
या प्रकारची व्याच्यात न करण्याची त्याने धमकीही दिली होती. आरोपी पाच दिवसापासून बेपत्ता आहे.
आरोपी सागर चव्हाण याच्यावर भा दं वि 376 (2) (1) , 354 ब, 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करून पोलोसनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. श्रीपुर आणि परिसरात ही बातमी कळताच ताबडतोब अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास ए. पी.आय.महेश विधाते करीत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






