👁 11 Views

प्रोटेक कंपनीच्या झरकॉनिक तंत्रज्ञानाच्या डिस्कचे अनावरण….

. पेटेंटबाबत सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करार

मुंबईदि. 29 : प्रोटेक कंपनीच्या मार्फत मेक इन इंडियाच्या संकल्पनेवर आधारीत झरकॉनिक तंत्रज्ञानाच्या डिस्कचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण झाले. दातांच्या शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त असलेले हे तंत्रज्ञान भारतासह संपूर्ण जगात उपलब्ध होणार आहे.
प्रोटेक या अमेरिकेन कंपनीच्या पेटेंटबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करार करण्यात आला. तसेच प्रोटेक कंपनीच्या लोगोचे अनावरणही श्री.देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
 शासकीय दंत महाविद्यालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता मानसिंग पवारमाजी विद्यार्थी तथा प्रोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश दुबेॲडवान्स बायोटेक्नॉलाजी व्यवस्थापकीय संचालक डॅनियल जंगप्रोटेक कंपनीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकीय संचालक रॅन गॅलेर्डोकल्पेश शुक्ला,ॲक्सीस बँक लिमीटेड चे मौलीक शाह आदी यावेळी उपस्थित होते. डॅनिअल जंग यांनी प्रोटेक कंपनीच्या झरकॉनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करुन माहिती दिली.
श्री.देसाई म्हणाले कीप्रोटेक कंपनीच्या मार्फत अमेरिकन पेटंटच्या झरकॉनिक तंत्रज्ञानाच्या डिस्कचे भारतात प्रथमच अनावरण होत आहे. ही बाब मोठी असून या तंत्रज्ञानाच्या फायदा भारतातील सामान्य जनतेला व्हावा यासाठी शासनामार्फत सर्वोतपरी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतात आरोग्य व अन्न औषध प्रशासन उद्योग क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या आहेत. मेक इन इंडियाच्या अंतर्गत झरकॉनिक तंत्रज्ञान व पेटंटचे हस्तांतरण भारतात पहिल्यांदाच होत असल्याचे  श्री. देसाई यांनी सांगितले. मेक इन इंडियाच्या अंतर्गत या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास यामार्फत लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राचे नाव मोठे होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *