👁 10 Views

भाजपच्या आमदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा, खासदारपुत्राचाही समावेश

मुंबई
मेसर्स धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस कंपनीचे नोंदणीकृत भागीदार नसतानाही एका कॉण्ट्रॅक्टरची साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अकोलाचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या चौघांमध्ये भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप याचाही समावेश आहे.
इमारतीच्या बांधकामाचे कॉण्ट्रॅक्ट घेणारे सुनील काळे यांच्या तक्रारीवरून रणधीर सावरकर, बळवंत मल्ले, प्रकाश पोहरे, हृषीकेश पोहरे आणि अनुप संजय धोत्रे यांच्या विरोधात भादंवि ४२०, १२० (ब), ५०४, ५०६ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसर्स धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस कंपनीने विक्रोळी कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक ८७, रायगड को-ऑ.हौ. सोसायटी या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम मला देण्यात आले होते. विकासक मेसर्स धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस या नावाने कामाच्या टप्प्यानुसार मी वेळोवेळी बिले सादर केली होती. मात्र प्रत्येक वेळेस मला धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस या नावाने बिलाच्या अर्धवट रकमेचा धनादेशच देण्यात आला. ८६ टक्के काम पूर्ण केल्यानंतर बांधकामाची थकीत रक्कम सहा कोटी ५० लाखांची विचारणा केली असता बलवंत महल्ले व रणधीर सावरकर यांनी शिवीगाळ केली. तसेच सावरकर यांनी कामाच्या ठिकाणी न येण्यास व आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे सचिन काळे यांनी सांगितले.
भागीदार दुसरेच…
भागीदार संस्था, निबंधकाकडे माहितीचा अधिकार कायद्यानुसार माहिती मिळविली असता धक्कादायक बाब समोर आली. विकासक मेसर्स धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस याचे सुरेश मोरे, रवींद्र कुळे व सोपन बोराडे हे नोंदणीकृत तीनच भागीदार आहेत. असे असतानाही बलवंत महल्ले, रणधीर सावरकर, प्रकाश पोहरे, हृषीकेश पोहरे व अनुप संजय छोत्रे यांनी स्वतःला नोंदणीकृत भागीदार असल्याचे भासवून धनलक्ष्मी एण्टरप्रायझेस या नावाने अकोला अर्बन को.ऑप. बँकेत दुसरे खाते उघडले व माझ्याशी आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याचा काळे यांचा आरोप आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *