👁 6 Views

वर्षभरात सिद्धांत फक्त एकच दिवस कॉलेजात गेला!

मुंबई
माझ्या मनात असायचे त्याच्या अगदी विरुद्ध आई करायची, असे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांचा मुलगा सिद्धांत सांगतोय. इच्छा नसतानाही आईने जबरदस्तीने इंजिनीयरिंगला टाकल्यामुळे वर्षभरात केवळ एकच दिवस सिद्धांत कॉलेजला गेल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली हिची हत्या त्यांचाच मुलगा सिद्धांत याने केली. आईवडिलांच्या रोजच्या भांडणाला आणि आईच्या स्वार्थी स्वभावाला कंटाळून तिला संपविल्याचे सिद्धांत याने सांगितले. आई नेहमीच माझ्या मनाविरुद्ध वागायची आणि करायची, असे सिद्धांत सांगतो. दहावी पास झाल्यानंतर सिद्धांतला रसायनशास्त्र शिकायचे होते; मात्र आईने जबरदस्तीने त्याला नॅशनल कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगला घातले. पण सिद्धांत वर्षभरात केवळ एकच दिवस कॉलेजमध्ये गेला. कॉलेजला जातो असे सांगून रेल्वे स्थानके, चौपाट्य़ा, बस स्टॉप, मॉल या ठिकाणी जाऊन वेळ घालवायचा आणि घरी जायचा.
हॉस्टेलमध्ये असताना प्रगती
पाचवीपासून दहावीपर्यंत सिद्धांत याला गणोरे दांपत्याने हॉस्टेमध्ये ठेवले होते. हॉस्टेलमध्ये असताना त्याची अभ्यासात प्रगती होती. दहावीतही सिद्धांतला ९० पेक्षा अधिक टक्के गुण मिळाले होते; मात्र घरी आल्यानंतर घरच्या वातावरणामुळे अभ्यासावर परिणाम झाल्याचे सिद्धांत सांगतो.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *