👁 5 Views

धक्कादायक: ऊसतोड कामगार महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म…… खुरप्याने कापली बाळाची नाळ

 

कोल्हापूर -उसतोड कामगार महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी ते गारगोटी रस्त्यावर घडली आहे. यावेळी महिलेची त्यांच्या उसतोड टोळीतील महिलांनीच प्रसुती केली.


दरम्यान, कोणतेही आवश्‍यक साहित्य उपलब्ध नसल्याने चक्क खुरप्याने बाळाची नाळ कापण्यात आली.


सध्या राज्यात विविध ठिकाणी उसतोडणी सुरु आहे. जिल्ह्यातील निपाणी आणि गारगोटी परिसरातही उसतोडणी सुरु आहे. रयत साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी टोळी निपाणी परिसरात कार्यरत होती. तर त्यांच्या टोळीतील काही जण हे गारगोटी येथे होती. यावेळी काही कामगार हे निपाणीहून गारगोटीकडे ट्रॅक्‍टरमधून जात होती. हा रस्ता खड्डेमय असल्याने महिलेला प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली.


जवळपास कोणतीही सुविधा नसल्याने अखेर रस्त्यातच प्रसुती करण्यात आली. बाळाची नाळ खुरप्याने कापल्याने मोठा रक्तस्त्राव होत होता. त्याच रस्त्याने संदीप पाटील हा युवक जात होता. त्याने तत्काळ यमगे येथील प्राथमिक केंद्रातील आशा सेविका यांना या घटनेची माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *