👁 8 Views

IND- PAK यांच्यात उद्या हायवोल्टेज ड्रामा, या खेळाडूंवर असेल दोन्ही संघाची मदार

पुढे स्लाईडद्वारे पाहा, दोन्ही देशातील कोणत्या खेळाडूंत होईल लढत…

टीप- खेळाडूंची तुलना दोन्ही संघाच्या सराव सामन्यातील आणि मागील काही ODI मॅचेसच्या आधारावर केलेली आहे.


स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात रोमांचक भारत- पाकिस्तान मॅच उद्या (4 जून) दुपारी 3 वाजता खेळला जाईल. बर्मिंघममध्ये होणा-या या मॅचसाठी दोन्ही टीम तयार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियापेक्षा पाकिस्तानचे पारडे जड आहे. ही एक अशी आयसीसी टूर्नामेंट (वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) आहे, जेथे पाकिस्तानने भारताला पराभूत केले आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीत असे आहे रिकॉर्ड….
– दोन्ही संघात आयसीसी टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत तीन मॅच झाल्या आहेत. ज्यात दोन पाकिस्तानने तर एक भारताने जिंकली आहे. – पाकिस्तानने या मॅच 2004 आणि 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत जिंकल्या होत्या. 
– तर, 2013 च्या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाने डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 8 विकेटने विजय मिळवला होता.
अश्विन-रहाणे बसू शकतात बाहेर-
– इंग्लंडची कंडीशन्स पाहता टीम इंडियाचा मेन स्पिनर आर. अश्विनला बाहेर बसवले जाऊ शकते. इंग्लंडमधील वेगवान खेळपट्ट्यावर फास्ट बॉलर्स टीमसाठी जास्त उपयुक्त ठरू शकतो. अशा वेळी जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांचे स्थान पक्के मानले जाते. 
– वॉर्मअप मॅचमध्ये चांगली कामगिरी करणा-य ऑलराउंडर हार्दिक पंड्याचेही संघातील स्थान पक्के मानले जात आहे. दिनेश कार्तिक सुद्धा संघात हवा या मताचा विराट कोहली आहे मात्र, केदार जाधवला संधी मिळू शकते. कारण अश्विनला वगळल्यास जाधवच्या ऑफ स्पिनचा पर्याय राहील.
– टॉप ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणेला बाहेर बसवले जाऊ शकते. रोहित शर्मा आणि शिखर धवन पुन्हा एकदा सलामीला खेळतील. मिडल ऑर्डरला विराट कोहली, युवराज सिंग आणि एमएस धोनी यांच्यावर जबाबदारी असेल.
– दुसरीकडे, पाकिस्तानचा वहाब रियाज दुखापतीमुळे उद्याच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
2017 मध्ये दोन्ही संघाची वनडेतील कामगिरी-
संघ मॅच विजय हारे
भारत 3 2 1
पाकिस्तान 8 3 5
भारत vपाकिस्तान वनडे रिकॉर्ड
मॅच 127
भारत विजयी 51
पाकिस्तान विजयी 72
नो रिजल्टः 4

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *