👁 10 Views

STएसटीच्या चालक-वाहकावर राजद्रोहाचा गुन्हा

बेळगाव
महाराष्ट्रातील ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरही राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने कर्नाटकातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यास बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या एसटींवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईहून निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्रीसाडे नऊच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. ही बस येताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी जल्लोष करत जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून त्यांचं स्वागत केलं. यावेळी पेढेही वाटण्यात आले. त्यामुळे बेळगाव मार्केट पोलिसांनी मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. १४३, १४७ आणि १५३ अ कलमाअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कानडी दमनशाहीच्या विरोधात कर्नाटकातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *