👁 12 Views

महिला आमदारानं लग्नात मुलीला सोन्यानं मढवलं ; तेही किलोंमध्ये

दागिने पाहून अनेकांचे डोळे विस्फारले


भारतात मंत्र्यांच्या मुलांची लग्न कायमच चर्चेचा विषय असतात. लग्नाचा मंडप, खानपान, दागदागिने यावर कोट्यवधींची उधळण केली जाते. अक्षरश: पाण्यासारखा पैसा लग्नात खर्च केला जातो. केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या आमदार गीता गोपी यांच्या मुलीचे लग्नही आता चर्चेचा विषय ठरत चाललं आहे. गीता यांनी आपल्या मुलीला लग्नात सोन्यानं मढवलं होतं. तिच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने पाहून अनेकांचे डोळे विस्फारले नसतील तर नवलच. नखशिखान्त सोन्यांच्या दागिन्यांनी मढलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रविवारी ४ जून रोजी त्रिसूर येथे हे लग्न पार पडलं. पक्षाच्या बैठकीतही हा विषय चांगलाच गाजला. एकिकडे डाव्या विचारसरणीच्या पक्षाकडून समाजवादाच्या गोष्टींबाबत भाष्य केले जात असताना दुसरीकडे अशा पद्धतीचे वागणे पक्षाच्या नेत्यांना कितपत शोभते असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
याविषयी गोपी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, हा चर्चेचा विषय नाही. कोणतेही पालक आपल्या मुला-मुलींसाठी जे करतील तेच मीही केले असे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यातले काही दागिने हे तिला नातेवाईकांनी भेट म्हणून दिले आल्याचं सांगत त्यांनी वाद क्षमवण्याचा प्रयत्न केला.
त्रिसूर येथील नट्टीका भागातून गोपी या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सोशल मिडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या वादात सापडल्या. केरळचे कृषीमंत्री मुल्लाकरा रत्नाकरण यांनीही नुकताच एप्रिल महिन्यात भव्यदिव्य पद्धतीने लग्न करण्याच्या गोष्टीवर विधानसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे अशाप्रकारच्या लग्न समारंभांविषयी काही ठोस कायदा बनवायला हवा अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे गीता यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचेही पक्षातील काही नेत्यांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *