राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही
( संग्रहीत छायाचित्र )
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १४ जूनपासून राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारिख २८ जून आहे. १ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. एक पेक्षा जास्त अर्ज आल्यास १७ जुलैरोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान होईल. तर २० जुलैरोजी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.





