लखनौ
उत्तर प्रदेशातल्या एका भाजप नेत्याने योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभाराला कंटाळून इस्लाम स्वीकारण्याची धमकी दिली आहे. योगी सरकार उत्तर प्रदेशात हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरले आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.
पवन अग्रवाल असे या भाजप नेत्याचे नाव असून वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा उल्लेख केला आहे. पवन अग्रवाल उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादचे भाजपचे शहर संयोजक आहेत. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यावर हिंदूंवरील अत्याचारांना आळा बसेल असे वाटले होते, मात्र हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदूंना त्रास देणे, त्यांची हत्या होणे किंवा त्यांच्या घरी चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे नेतेही उत्तर प्रदेशात सुरक्षित नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





