👁 9 Views

साखर कामगार – शेतकरी सभासद व भवितव्य-एक संकल्पना = भाग 2

साखर कामगार व भवितव्य एक संकल्पना या विषयाचा पहिला भाग सर्व प्रथम दै.महाराष्ट्र टाईम्स ,दै. एकमत-सोलापूर,दै.पंढरपुर लाईव्ह गाववाला -हिंगोली, साखर डायरी ने प्रकशीत केल्याने या क्षेत्रातील व्यथा व समस्या ख-या अर्थाने सर्वासमोर आल्याने या क्षेत्रातील “शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध परिवारासह 60-70 साखर कारखान्यारील प्रतिष्ठित मान्यवरांची एक बेंठक पुणे येथे आयोजीत केली आहे.या बेंठकीत विचार-विनिमय होवुन राजकारण विरहित एक सामाजिक वैचारिक स्वरूपाचा ट्रस्ट स्थापन करून स्वयंप्रेरनेने व शासनाकडे पाठपुरावा करणेसाठी एक सामाजीक व्यासपीठ निर्माण होण्याची गरज असल्याचा सकारात्मक विचार पुढे येत आहे*
*साखर कारखानदारी हि ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी होय.परंतु साखर कारखाने हे ना शहरे ना खेडी या दोहोंच्या मध्यावर उजाड माळरानावर वसलेली एक वसाहत होय .यातील बहुतांशी ठिकाणी मुलभुत सुविधाचा अभाव जाणवतो. म्हणुन या क्षेत्रातील सर्व सामान्य साखर कामगार व शेतकरी वर्गा करीता ” महा साखर संमेलन ” – पाल्याना मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी सोई सवलती, वस्तीगृह, मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुविधा युक्त आरोग्य सुविधा, जिल्हात “एक भुजलवाढ -सौरऊर्जायुक्त साखर गावं -एक पथदर्शक गृहप्रकल्प ” ज्यात शेतकरी वर्गासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर जिल्हात एक खात्रीशीर शास्वत बाजारपेठ निर्माण होईल, महिलांना गृहउधोग, बेरोजगार युवकांना रोजगार निर्माती , शैक्षणिक व उच्च शैक्षणिक सुविधा, सर्वर्धमीय सामूहिक विवाह सोहळे, सेवानिवृत्ती नंतरचे सुखी जीवन, अतिअल्प जमीन व पाण्यात संरक्षित विषमुक्त नेसर्गीक शेतीतून कुटूंबाचा शाश्वत उदरनिर्वाह,झाडे लावा-झाडे जगवा, वृक्षसंवर्धन,पाणी आडवा पाणी जिरवा, बचतगट, बँकींग च्या माध्यमातून आर्थिक उन्नती आदी सकारात्मक ,रचनात्मक व विधायक विचाराचे रोपटे लावण्याचा विचार पुढे येवू इच्छितो आहे*




*उद्दिष्टे व ध्येय*
साखर कामगार व शेतकरी सभासद यांना आधुनिक ,स्पर्धात्मक,तांत्रिक व धकाधकीच्या युगात अपडेट व टिकून राहनेरसाठी त्यांचे अस्तित्व सक्षम करणे .
प्रथम, दितीय, तृर्तीय तथा पंचवार्षिक एका साखर कारखाना कार्यस्थळावर सर्व साखर कामगार व शेतकरी सभासद यांचे *महा साखर संमेलन* भरून एक व्यापक सामाजिक व्यासपीठ निर्माण करणे.जेणेकरून साखर कामगार व शेतकरी यांना व्यासपीठ व आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध होईल.
या माध्यमातून परिवारातील एक कुशल ,गुणवंत साखर कामगार, एक शेतकरी सभासद, एक अधिकारी, यांचा भव्यदिव्य *”साखर रत्न सन्मान”* सत्कार समारंभ व साखर कामगार व शेतकरी सभासदास किमान वार्षिक शिष्यवृत्ती देणे.
साखर कामगार 60 वर्ष तन्मतेने कारखाना सेवेत कार्यरत राहिल्याने त्याचे गावं व नातलंगाशी नाळ तुटलेली आसते,त्यामुळे तो गावी जावून स्थिर होणे फार मुशिकील होते.तुटपूज्या आर्थिक परस्थिमुळे तो गावी स्वतःचे घर सुध्दा बांधू शकत नाही.म्हणून या वर्गासाठी 1/४रक्कमेच्या तथा 50 टक्के रक्कमेच्या वा स्वस्तात हक्काचे घर निर्माण करणे साठी यशस्वी पायलट प्रोजेक्ट – *”प्रत्येक जिल्ह्यात एक साखर गावं’* निर्मातीसाठी सर्वाच्या सहकार्यातून अथक शास्वत, यशस्वी – भुजल पातळी वाढवणारी व सौरऊर्जा स्वयंनिर्मित,वृक्षसंवर्धनाने नटलेली *”पथदर्शक गृहप्रकल्प”*उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.
या माध्यमातून साखर कामगार ,शेतकरी तसेच या क्षेत्रातील बेरोजगार,निवृत्त,महिला गृहउधोग, शेतकरी व इतरांसाठी हक्काचे शास्वत ना नफा ना तोटा या तत्वावर जिल्हातील एक खात्रीशीर मार्केट तथा विश्वासाची बाजारपेठ उभी राहू शकेल.
संमेलनाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील विविध विषयांवर मान्यवरांचे विचारमंथन,चर्चासत्र ,उधोगाच्या भरभराटीसाठी उपाययोजना-एक परिसंवाद , उदयमुख व्यक्तिमत्वाचे लेखन -वाचन-नाट्य-कला-सांस्कृतिक व संस्कार या कलागुणांना वाव देणे, सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.
स्व-स्वावलंबन,सेवानिवृत्ती, नवीन कायदेविषयक माहिती, शासकीय सोई सवलती, पीएफ योजना, बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती, बचत व संरक्षण योजना ,रोजगार उपलब्धता, व्यक्तिमत्व विकास,शैक्षणिक सबलता , वैधानिक शोध-संशोधन,होस्टेलिंग,आरोग्य,सुविधा आदी निर्माण करणे.
आधुनिक कमी पाण्यात उसलागवड, अतिअल्प पाण्यात व कमीत कमी जागेत शास्वत ,विषमुक्त नेंसर्गिक शेती करून -कुटूंबाची उदरनिर्वाह कसा करावा, सामूहिक व करार शेती, बेटी बचाव अभियान, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, परिवाराचे साप्ताहिक मुखपत्र, आदी विषयी मार्गदर्शन व साखर क्षेत्रातील सर्व घटकांना *कौटूंबिक परिवार* या संवद्या खाली आणून राजकारण विरहित *”शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध – एक परिवार”* या शिर्षकांनव्ये व्यापक सामाजिक परिवार निर्माण करण्याच्या कार्याचे रोपटे लावणे.


*पथ्ये:-*
हा परिवार पूर्णपणे राजकारण विरहित सामाजिक -आपलेपणा-कोटूंबिक जिव्हाळा व ऋणानुबंध निर्माण करणारा एकसंध परिवार असेल, यात कुठलाही स्वार्थ,अभिर्भाव, हाळवेपणा नसेल.
सामाजिक ,सामूहिक कार्यास प्राधान्य देण्यात येईल,हा परिवार राजकारणापासून अलिप्त असेल, लोकशाही व संविधानाची मूल्ये जपेल.
व्यसनाधिनतेला येथे पूर्णपणे पाबंदी असेल.
पगारवाढ, वेतनकरार किंवा यासम हक्कांसाठी या व्यासपीठाचा वापर करता येणार नाही,यासाठी तत्पूर्वीच या क्षेत्रात संविधानिक व्यवस्था कार्यरत आहे.


*समस्या*
*अ) उद्योगाच्या ब) कर्मचा-यांच्या क)त्यांच्या कुटूंबियाच्या*


*अ)उद्योगाच्या:-*
नेंसर्गीक आपत्ती, दुष्काळ
हंगामी उद्योग 
साखरेच्या दरात सतत होणारा चढ-उतार
प्रगत तंत्रज्ञानाची कमतरता 
एफ आर पी दर ठरविण्यात होणारा विलंब.
प्रगत तंत्रद्य व कुशल कामगारांची कमतरता.
आर्थिक सहाय्य मिळण्यास येणं-या अडचणी.
भोगोलिक परिस्थिती ,शेतक-याचे प्रगत ऊस लागवडी बाबतचे अज्ञन व त्यामुळे होणारी साखर उता-यातील घट.


*ब) कर्मचा-यां च्या:-*
साखर कामगार हि शेतकरी सभासदाचीच मुलं आहेत ,वयाची 60 वर्षी होइपर्यत ते कारखान्याची सेवा करतो.पगारवाढ व पदोन्नती मिळण्यासाठी त्याला सतत कारखाना बदलावा लागतो. या बदलामुळे त्यांचे स्थेर्य, पाल्याचे शैक्षणिक धोरण व संस्कारांचा -हास होतो.
बदलाच्या भोगोलिक परिस्टितीमुळे त्यांचे अरोग्य धोक्यात येते.
चाललेल्या आधुनिक ,तांत्रिक, धकाधकीच्या व स्पर्धात्मक युगाकडे लक्ष देण्यास तथा अपडेट राहण्यास त्यास वेळचं मिळत नाही.तसेच तो या काळापासून दूर जात राहतो.म्हणून आपला कामगार व कुटूंबीय या काळाच्या ओघात मागे राहू नये अशी भिती निर्माण होते.
हंगामी नोकरी


*क) त्यांच्या कुटूंबियांच्या:-*
उपरोक्त सुखदुःखात त्यांचे कुटूंब समवेत असते,60 वर्ष उद्योगाशी निगडीत राहिल्याने गांव व नातलंगाशी कुटूंबियाची नाळ तुटते.
बहुतांशी साखर कारखनाने साईट शहराजवल असेलच असे नाही, कारखाना साईट हि ना शहर ना खेडे या दोहोंच्या मध्यात उजाड माळरानावर वसलेली वसाहत.
त्यामुळे शैक्षणिक सुविधा ,उच्च शिक्षण, क्लासेस ,मार्गदर्शन,आरोग्यविषयक सुविधा, मार्केटींग यांच्या अभावामुळे शैक्षणिक अधोगती ,स्पर्धत्मक युगात अपडेट्स रहाणे जिकरीचे होते.
मुलांचे वाढते वय व त्यांच्या वाढत्या गरजा,नोकरी -रोजगार,लग्न,समस्या व यातच येवून ठेपते ती सेवानिवृत्ती,त्यामुळे या वयात जीवघेणा प्रसंग उभा राहतो.
गावांशी तुटलेली नाळ जोडण्याचे अथक परिश्रम ,स्वतः व कुटूंबियासह जडलेले दिर्घ आजार ,राहण्यासाठी घर असे अनेक प्रश्न कुटूंबासमोर उभे राहतात.
रेशनकार्ड,शेषणकार्डे,ना अधारकार्ड, ना कुणाची साथ ,शासकीय अनास्थ,भ्रष्ट व्यस्था,ना मेडिकल सुविधा,ना आर्थिक पाठबळ जावे तिथे घोडे अडलेलेच. या वयात डोळ्यासमोर कहोळ उभे राहते व आपला साखर कामगार हँग(अस्वस्थ/बेचेन) होतो.व त्याचे कुटूंब उघड्यावर पडते.


*अपेक्षा*
*अ) व्यवस्थापणाकडून – त्यांच्यापर्यंत कशा पोहचवायच्या?*
प्रत्येक साखर कारखान्यात मा. कार्यकारी संचालक व व्यवस्थापन यांचेमार्फत आपले परिवाराचे ट्रस्ट करीता साखर कारखान्यातील सर्व कामगार व शेतकरी सभासद यांना परिवाराचे सदस्य करून घेण्यास सहकार्य व मदत करणे.
प्रत्येक साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यशाळा,विचारमंथन व चिंतन शिबिरे घेऊन संकल्पना विषयी जनजागृती निर्माण करण्यास प्रोतसाहित करणे.
प्रत्येक साखर कारखान्यात मा. कार्यकारी संचालक व खातेप्रमुख यांचे मार्गदर्शनपर परिवारासाठी स्वयंप्रेरनेने वेळ देणारे प्रत्येक स्थरातील विभागवाईज 12 निर्व्यसनी ,निस्वार्थी, स्वच्छ प्रतिमेचे स्वयंसेवकाची निवड करणे.ते स्वयंसेवक परिवाराचे कार्य समृद्ध करण्यास तत्पर राहतील.
परिवाराची व्याख्याने, संवाद-परिसंवाद, कार्यशाळा,शिबिरे,बचतगट, गृहउधोग,किरकोळ निधी संकलनास मंजुरी देवुन प्रोत्साहित करणे.
महिना तथा दोन महिन्यातुन एक दिवस सकाळी 3-4 तास वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन,जलसंवर्धनपरिसर स्वछता, कार्य सर्व परिवारा तर्फ श्रमदानातून राबविण्यास प्राधान्य देणे.
महा साखर संमेलन भरल्यास सर्वोतपरी सहकार्य व मदत करणे.


*ब) शासनाकडून (केंद्र व राज्य) – त्यांच्याप्रर्यत कशा पोहोचवायच्या?*
साखर कामगार – व्यवस्थापन – शासन व केन्द्रशासन या घटकांना अभिप्रेरित धरून यांचेकडे पत्रव्यवहार /चर्चा प्रकल्प अहवाल सादर करून सतत पाठपुरावा करणे.
वेळोवेळी ट्रस्टीच्या माध्यमातून मिटींग्ज ,चर्चा,गटचर्चा,करून स्वयंप्रेनेने परिवाराचे कार्य व वाटचालीस सुरुवात करणे.
वार्षिक आढावा घेवून *”महा साखर संमेलनातं “* त्याविषयी ठराव पारित करून शासनाकडे पाठपुरावा करणे.


*आपली कर्तव्य*
*अ) कारखानाप्रती ब) कुटूंबाप्रति क) समाजाप्रती*


*अ) कारखानाप्रती*
जेव्हा आपण उपरोक्त अपेक्षा धरतो, तेव्हा कारखानप्रती आपली जबाबदारी अधिक वाढलेली असते. आपणही कारखानाप्रती 24 तास 100टक्के प्रामाणिक राहायलाच हवे.
आपला साखर कारखाना युनिट माझा एक कोटूंबिक परिवार आहे हि संकल्पना मनात तंतोतंत रुजायला हवी.
आपला कारखाना आपली लक्ष्मी आहे,यावरच माझे जीवन अवलंबून आहे त्यामुळे आपली सर्व्हिस तत्परतेत आपण कधीच कमी पडत नाही परन्तु यात आणखी वाढ वृद्धिंगत होणे गरजेचे होय.
कारखाना अडचणीच्या काळात आपण व्यवस्थापणाशी सहकार्याची भावना ठेवायला हवी.
आपला कारखाना परिसर नेहमी स्वच्छ, सुंदर व निसर्गाने नटलेला ठेवण्यास कटिबद्ध असलेच पाहिजे .
नेहमी करता व्यसनमुक्त राहून निरोगी योगयुक्त नेंसर्गीक आनंदी तणावमुक्त जीवन जगावे.
कारखान्याची प्रगती,आपले कामात गती ,नाविन्य,साखर कॉलिटी,रिकव्हरीत वाढ ,प्रगत तंत्रद्यानाचे अवलोकन ,आपले कारखाना युनिट आधुनिक युगात सतत अग्रेसर राहील हे आपले सदैव ध्येय असलेच पाहिजे.


*ब) कुटूंबाप्रती:-*
आपण आयुष्यभर कारखाना सेवेत कार्यरत असतांना आपले कुटूंबही आपल्या सुखदुःखात सहभागी आसते .
त्यांचे पालन, पोषण ,
अडीअडचणी, शैक्षणिक धोरण,बचत विमा ,पॉलिसीज ,आरोग्य,यांची काळजी जाणीवपूर्वक आपण घ्यायलाच हवी.ते आपले अध्य कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही.
गावाकडील नातेवाईकांशी संपर्कात राहणे ,गावांशी नाळ तोडू नये.
*क) समाजाप्रती:-*
शेतकरी व कामगार हि देशाची *बलस्थाने* होय. हे *देशास उत्पादन व विकसित तंत्रज्ञान देणारी – उत्पादित व्यक्तिमत्व होय*.
या उत्पादित व्यक्तिमत्वास सदैव प्रबळ व सक्षम करणे हि आपणा सर्वाची जबाबदारी आहे
आपण जीवन जगतांना समाजाचा केवळ एक सामान्य भाग होवून राहण्यापेक्षा समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या उद्दात भावनेतून आपणही समाजासाठी राजकारण विरहित विधायक ,रचनात्मक कामाची मुहूर्तमेढ रोवायला हवी.
मोठे काम जमत नसेल तरी खारुताईचा वाटा उचलून आपण चांगल्या विचारांचे रोपटे लावण्यास हातभार लावायलाच हवा.
सर्वाजणीक व सामुहिक कार्यात तत्परतेने सहभागी असावे .
*शेतकरी-कामगार आत्महत्या करत आहेत* असे म्हणत रडत बसने योग्य नाही ,त्यांना या प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हात एक खात्रीशिर ना नफा ना तोटा या तत्वावर एक बाजारपेठ निर्माण करता येईल.
भविष्यात सर्वात मोठी समस्या पाणी आपणांस भेडसावणारी आहे. नव्हे नव्हे यासाठी पुढे चालून महायुध्देसुद्धा होतील. म्हणून वेळीचं काळाची पावले ओळखून आपण जास्त नाही परंतु एक तरी ओवी अनुभवावी म्हणून वृक्ष-वृल्ली आम्हां सोयरी ……. या उक्तीप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा ,वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा ,स्वच्छ व सुंदर परिसर या संकल्पना व अभियान सक्षमपणे राबविण्याचे अंगीकारायलाच हवे.


*स्पर्धेला सामोरे जाणे:-*
आधुनिक ,तांत्रिक,स्पर्धत्मक व धकाधकीच्या जीवनात माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे.देश व जगात कशाच्या घडामोडी होत आहेत ,माझा व्यवसाय ,माझा समाज, माझे कुटूंब,माझा उधोग,व साखर कारखाना या जगतात नेमके कुठे आहे.या स्पर्धात्मक युगात आपणही योग्य गतीत वाटचाल करत आहोत का?याचे अनुमान ,निष्कर्ष वेळोवेळी घेवून आपणही या युगात अपडेट्स राहायला हवे.
काळ कुणासाठी ही थांबत नाही,काळ बदलत चाललेला आहे.तेव्हा आपणही काळाची पावले ओळखुन आपल्या समूहात योग्य तो बदल घडवून उन्नती व प्रगती साधायला हवी.
अलीकडच्या काळात कोंटुबिक पध्द्तीच -हास होवून स्पर्धात्मक व धकाधकीचे,जीवनमान जगताना आपण पाहत आहोत.त्यामुळे शैक्षणिक ,आर्थिक ,आरोग्यमय,सामाजिक व रोजगाराभिमुख गोष्टींच्या विचारा करीता आपण सजग व तत्पर असलेच पाहिजे.
स्पर्धेला सामोरे जातांना आपण यात कसे यशस्वी होवु याचे काटेकोर नियोजनपूर्वक प्लनींग करायलाच हवे.
जिल्हात एक साखर गांव या माध्यमातून साखर कामगार ,बेरोजगार ,महिलांना,गृहउद्योग ,शेतक-यांना खात्रीशीर बाजारपेठ निर्माण होवू शकेल.


*आत्मपरीक्षण/चिंतन*:-
जीवन जगतांना आपण समाज, कारखाना युनिट ,लोकप्रतिनिधी, प्रशासन व शासनाकडून अपेक्षा फार ठेवतो.
हे असे नको होते – हे असे असायला हवे होते .हे कोणीतरी का करत नाही ? हे यांना का समजत नाही? असे अनेक प्रश्न मनात सतत निर्माण होत असतात.
पण एक प्रश्न आपल्याही मनाला विचारा ,आत्मपरीक्षण 100 टक्के आत्मचिंतन करा की यासाठी मी काय करू शकतो,हे सर्व सुधारण्यासाठी मी किती वेळ देवू शकतो ,मी या बदलाचा एक भाग होवू शकतो का? मी यात उडी घेवून काहीतरी करू शकेल का? माझ्यात काय कमीपणा आहे ? या बाबीचा सकारात्मक विचार करून आपल्या आतील मनाला विचारा की मी किती प्रामाणिक आहे? 
मी समाज तथा दुस-याच्या चांगल्या प्रती किती विचार करतो याचे चिंतन करा,चांगळे विचार-आचार मनात आणा, चांगली पुस्तके वाचा, समूर्ती जागृत ठेवा,बोध्दीक्तता वाढवा,समाजाप्रती आपण काही तरी चांगले देणे लागतो याची मनाशी खुणगाठ बांधा,चांगली उधीष्टे व ध्येय निश्चित करा,स्वार्थ सोडा,निष्कलंक व चरित्र्यशील स्वच्छ जगा मग पहा जग कसे सुदंर आहे.जीवन कसे सुंदर आहे.


*कायदेशीर बाबी:-*
आपणांस आपल्या साखर क्षेत्रातील सर्व व्यतिमत्वासाठी मांडलेल्या वरीलप्रमाणे संकल्पना व उधिष्टे साकारन्यासाठी कायदेशीर बाबीसाठी व्यवस्थापन व शासनाकडे पाठपुरावा करणेसाठी सर्व समावेशक *”शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध – एक परिवार “* व्यसपीठाद्धारे ट्रस्ट स्थापन करून वेळोवेळी मिटींग्ज व चर्चेतून पुढील वाटचाल व प्रकल्प अहवाल करणे क्रमप्राप्त आहे.


अविनाश मनोहर कुटे पाटील
(ऑटो-कॅड इंजिनिअर) नेवासकर
9226428756,9881065240
Kutepatil02@gmail.com*



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *