👁 5 Views

पित्याची हत्या करून आत्महत्येचा बनाव, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच

 

पिंपरी चिंचवड : बाप दररोज प्रेयसीला शिवीगाळ करायचा म्हणून संतापलेल्या  मुलाने बापाला संपवल्याची  धक्कादायक घटना दिघी परिसरात उघडकीस आली आहे.


बापाची गळा आवळून हत्या केली, मग मृतदेह पंख्याला लटकवत आत्महत्येचा बनाव केला. मात्र अखेर हा बनाव उघडकीस आला. या गुन्ह्यात आरोपीची आई आणि मोठ्या भावानेही साथ दिली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अशोक रामदास जाधव असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.


जाधव कुटुंबीय हे दिघी परिसरातील समर्थ सदन इमारतीत राहते. रामदास जाधव हा आपल्या छोटा मुलगा अनिल जाधव याच्या प्रेयसीला शिवीगाळ आणि अपशब्द बोलायचा. यामुळे अनिलचा संताप झाला. संतापाच्या भरात त्याने बापाचा गळा आवळला. मग मोठा भाऊ आणि आईच्या मदतीने मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आले


यानंतर अनिल जाधव याला हत्येप्रकरणी, तर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी राहुल जाधव आणि रामदासची पत्नी यांच्याविरोधात दिघी पोलिसात आई आणि दोन मुलांविरोधात कलम 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *