पुणे: प्रेयसीबद्दल अपशब्द बोलल्याने, संतापलेल्या मुलाने आपल्या वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात घडली आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे खून केल्या नंतर वडलाचा मृतदेह पंख्याला लटकवून वडलानी आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी दोन भाऊ आणि त्यांच्या आईला पोलिसांनी अटक केली.
ह्या दुर्दैवी घटनेत अशोक रामदास जाधव ह्या 45 व्यक्ती वर्षाच्या व्यक्तीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दिघी पोलिसांनी मयत अशोक रामदास जाधव यांचा मुलगा अनिल जाधव आणि राहुल जाधव तसेच मयत अशोक रामदास जाधव यांच्या पत्नीला अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक जाधव यांचा मुलगा अनिल जाधव ह्याच एका मुली सोबत प्रेम संबंध आहेत. मात्र ह्याच प्रेम संबंधा वरून वडील अशोक जाधव यांनी आपल्या मुलाच्या प्रेयसी बद्दल अपशब्द बोलल्याने, संतापलेल्या मुलाने आपल्या भावाच्या मदतीने त्यांचा गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर मुलगा अनिल आणि राहुल जाधव याने आपल्या वडिलांचा मृतदेह घरातील पंख्याला टांगून आत्महत्या झाल्याचा बनाव केला आहे. तर आईने फरशी वर पडलेला रक्त पुसून पुरावा नष्ट केल्याने दिघी पोलिसांनी आईला देखील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी करत अटक केली आहे.



