👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 25

Acuyoga उपचार-





1. मेंदू आणि मज्जातंतूंचे आजार.
 यामध्ये मुख्यत्वे GV-20 आणि extra – 6 हे बिंदू येतात.
त्यासाठी पूर्ण शीर्षासन आहे, पण हर जमत नसल्यामुळे अर्ध शीर्षासन करावे. 
1) गुडघ्यावर बसावे दोन्ही हात पुढे घेऊन कंबर उचलावी. दोन्ही हाताचे कोपरे टेकवावे हात एकमेकांत गुंतवावे. डोके गुंतवलेल्या हाताच्या पंज्याजवळ टेकवावे. शरीराचा भार हाताच्या कोपरावर देत कंबर उचलावी नंतर सावकाश भार डोक्यावर जमेल तेवढा द्यावा. डोके पुढे मागे, डावीकडे उजवीकडे सावकाश करत रहावे. डोक्यावरील वेगवेगळया बिंदूवर अक्यूप्रेशर होते.



2) खुर्चीवर किंवा दंडासनात बसावे. दोन्ही हाताच्या मुठी आणि पायाची बोटे मुठीप्रमाणे आवळावी आणि श्वास सोडावा. श्वास घेताना हाताची आणि पायाची मूठ सोडावी व हातापायांची बोटे तणावी . पुनः श्वास घेत हाताची आणि पायाची मूठ(बोटे) गच मिटावी हि क्रिया क्षमतेनुसार 20 ते 30 वेळा करावी.
तळहातावर P-8 आणि तळपायावर K-1 हे महत्वाचे बिंदू आहेत. त्याचा उपयोग छातीत दुखणे, बेशुद्ध होणे, फिट येणे, हात थरथरने, मनोविकार, तोंड येणे इ. साठी होतो.



युरीनरी ब्लॅडर आणि गव्हर्निंग व्हेसलचा Acuyoga करावा. Acuyoga तील 7 ते 10 हि क्रिया डोके दुखीसाठी करावी.


डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ एक्यूयोगा 

क्रमशः

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *