पंढरपूर शहरातील इसबावी भागातील अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असलेल्या भुयारी गटार योजनेचा कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, याभागातील नगरसेवक विशाल मलपे, भाग्यश्री शिंदे, माजी नगरसेवक गणेश आधटराव, सचिन डांगे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पंढरपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना क्र.१ यापुर्वी राबविण्यात आला होता. परंतु शहरा लगत असणारी उपनगरे व इसबावी भागामध्ये भुयारी गटार होणे गरजेचे असल्याने शासनाकडुन भुयारी गटार योजना टप्पा क्र.२ राबविण्यात आला होता. या योजनेमध्ये ३००० मी. चे काम करण्यात येणार होते. त्यापैकी १४०० मी.चे काम पुर्ण करण्यात आलेले होते व १६०० मी.चे काम शेतक-यांनी भुयारी गटारची पाईपलाईन टाकण्यास विरोध केल्याने गेल्या अनेक वर्षांपासुन हा प्रश्न प्रलंबीत होता. या भागातील नगरसेवक विशाल मलपे यांना त्या भागात असणा-या नागरीकांनी वारंवार सदरची भुयारी गटार योजना लवकरात लवकर पुर्ण करावी व प्रलंबीत असणारा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. कारण सदरचे भुयारी गटार योजना अपुर्ण राहिल्यान अनेक ठिकाणी झालेली ड्रेनेज लाईन तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होत होते. तसेच हे घाण पाणी नदी पात्रात जात होते. नगरसेवक विशाल मलपे यांनी ड्रेनेजलाईन अडविणा-या शेतक-यांशी प्राथमिक चर्चा करुन सदर शेतक-यांचे शिष्टमंडळा समवेत आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या समोर शेतक-यांच्या अडचणी मांडल्या. त्यावर त्याठिकाणी असणारा डिपी रोडची आखणी करुन सदरच्या डीपी रोडमधुन सदरची ड्रेनेजलाईन टाकण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लागल्याने इसबावीमधील नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमास पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर, सुकदेव मलपे, रघुनाथ मलपे, नितीन मलपे, दत्ता शिंदे, समाधान मलपे, आबा शिंदे, प्रकाश गुंड, शिवाजी शिंदे, सचिन शिंदे, नागेश सुर्यवंशी, सुनिल गाजरे, गणेश मलपे, शुभम मलपे, रोहीत मलपे हे उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




