👁 9 Views

पालखी मुक्कामापूर्वीच सुविधा उपलब्ध ठेवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Pandharpur Live 14 jun 2017
सोलापूर दि. 14 : – आषाढी वारी निर्मल वारी व्हावी,  ही निर्मल वारी सर्वांच्या लक्षात राहावी अशा प्रकाराचे काम आषाढी वारीत व्हावे.  यासाठी आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालख्या त्यांच्या नियोजित मुक्कामाच्या स्थळी येण्यापूर्वीच त्या ठिकाणी शौचालय, पाणी, वीज. आरोग्य व स्वच्छतेची व्यवस्था संबंधित अधिकारी व यंत्रणांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या.
            आषाढी वारी संदर्भात सुरु असलेली कामांचा आढावा  घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, संजीव जाधव, यांच्यासह आषाढी वारीसाठी नियुक्त केलेले तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आषाढी वारी निर्मलवारी करण्यासाठी प्रशासन सज्ज असून संबंधित यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी उत्कृष्‍ठरित्या पार पाडावी. जिल्ह्यात येणाऱ्या पालख्या, वारकरी, भाविक यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येकाने नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे. शौचालयाच्या ठिकाणी पाण्याचे टँकर पोहचविण्याठी कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. वारीच्या मुक्कामानंतर त्या ठिकाणच्या मैल्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी. यामुळे कोणत्याही प्रकराची दुर्गंधी होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. शौचालय वाहतूक करणारी वाहने पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मुक्कमास येण्यापूर्वीच नियोजित वेळेत पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा. यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्ष रहावे, अशा सूचनाही  जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.
पावसाळा सुरु झाला असून आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे.  आरोग्य विभागाने ॲम्ब्युलन्स व वैद्यकीय सेवा देणारी डॉक्टर्स,  अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध करुन ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या. वारी  कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या आत्पकालीन केंद्रामध्ये  ( EOC) नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  तसेच वाळवंट आणि 65 एकर मध्ये गुड मॉर्निंग पथकाने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.

            बैठकीत वाहतुक नियोजन, पार्किंग, टोल फ्री क्रमांक, रॉकेल व गॅस पुरवठा, वाळंवाटतील खड्डे बुजविणे, धोकादायक इमारती, पंढरपूर शहरातील अतिक्रमण, अन्न व औषध प्रशासन याबाबत आढावा घेण्यात आला.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *