👁 12 Views

केरोसीन दरात सुधारणा…. जूनसाठी गहू व तांदूळ नियतन मंजूर..!

Pandharpur Live 14 jun


केरोसीन दरात सुधारणा
सोलापूर दि.14 :- सोलापूर शहरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या किरकोळ केरोसीन (रॉकेल) विक्रीदरात सुधारणा केली आहे. यापूर्वी किरकोळ रॉकेल विक्रीचा प्रति लिटर 20 रूपये 40 पैसे इतका दर होता यामध्ये बदल होवून 20 रूपये 70 पैसे इतक्या दराने रॉकेल विक्री करण्यात यावी असे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत.
00000
जूनसाठी गहू व तांदूळ
नियतन मंजूर
सोलापूर दि 14 :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न  योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी माहे जून  2017 साठी गहू व तांदूळाचे नियतन  (अन्नधान्य) मंजूर झाले आहे.यामध्ये  अंत्योदय अन्नयोजनेंतर्गत प्रतिकार्ड लाभार्थ्यांना 30 किलो गहू तर 5 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. यानुसार  अंत्योदय अन्न योजनेसाठी 2140.50 क्विंटल गहू व 356.75 क्विंटल तांदूळ आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी 12226.83 क्विंटल गहू व 8151.22 क्विंटल गहू नियतन मंजूर असल्याचे  जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी कळविले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *