राज्यातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पात्रता मिळविलेल्या ७ दंतशल्यचिकित्सकांना सहायक प्राध्यापक या पदावर सामावून घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यात सध्या १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ३ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक असे तीन संवर्ग अध्यापनासाठी कार्यरत आहेत.
भारतीय दंतपरिषदेच्या मानकानुसार, दंतशल्यचिकित्सक हे पद ट्युटर संवर्गात आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) नियम ५२ मधील परिशिष्ट २ नुसार प्राध्यापक (दंतशास्त्र) आणि दंतशल्यचिकित्सक ही दोन्ही पदे पूर्णकालीन अध्यापकीय स्वरुपाची आहेत. पैकी दंतशल्यचिकित्सक हे एकाकी स्वरुपाचे पद आहे. त्यांना पदोन्नतीची साखळी उपलब्ध नाही. दंतशल्यचिकित्सकांना पदोन्नती साखळी उपलब्ध व्हावी, यासाठी सहायक प्राध्यापक पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे.
दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये सेवा अंतर्गत कार्यरत दंतशल्यचिकित्सकांना पदव्युत्तर शिक्षणासाठी 15 टक्के आरक्षण आहे. हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शासन सेवेतील दंतशल्यचिकित्सकांच्या उच्च शिक्षणाचा फायदा शासन सेवेसाठी व्हावा, म्हणून अशा पात्र ७ दंतशल्यचिकित्सकांना वयाची अट शिथिल करुन सहायक प्राध्यापक पदावर सामावून घेण्यास मान्यता मिळाली आहे. एक वेळेची बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



