पंढरपूर,.दि.२१मे, जालण्याचे रहिवासी ईश्वरलाल परदेशी यांचा मुलगा चि.नितीन साठी मुलगी पाहण्यास पंढरपूर येते आले चि. नितीन यांनी मांजरी, पंढरपूर येथील किशोर परदेशी यांची मुलगी शितल ला पसंत केले व शितल नेही होकार दिला व त्वरित साखरपुडा करण्यास सहमती दिली. बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी यांनी दुष्काळी परिस्थिती ची जाणीव ठेवून, सामाजिक बांधिलकी राखून , आणावश्यक खर्चाला फाटा देऊन, साखरपुड्यात लग्न समारंभ पार पाडवे अशी सुचना मांडली, अपाध्यक्ष विजय परदेशी , बाळासाहेब परदेशी, हरीलाल परदेशी, सुकलाल परदेशी,संजय परदेशी,माजी नगरसेवक प्रकाश परदेशी यांनी सुचना बरोबर असल्याचे सांगुन ईश्वरलाल परदेशी यांना विनंती केली व थी परदेशी यांनी साखरपुड्यात लग्न पार पाडण्यास माण्य केले. बाथ्री तेली समाज भवन, जुनी पेठ, पंढरपूर येथे सायंकाळी विवाह सोहळा आनंदात पार पडला. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कोतुक होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



