👁 10 Views

वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

फलटण (जि. सातारा) : पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण शहरात स्वागत करण्यात आले. ‘माउली… माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली.
फलटणच्या विमानतळावर विसावा घेऊन पालखी मंगळवारी बरडकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी जिंती नाक्याहून मलटन, पाचबत्ती चौक मार्गे मुधोजी
मनमोहन राजवाड्यासमोर आल्यानंतर पालखीचे स्वागत नाईक-निंबाळकर घराण्याच्यावतीने सातारा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असा संदेश अभंगातून देत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश तुकोबारायांनी दिला. हाच वसा घेऊन पुणे येथील वृक्षवल्ली ग्रुप पर्यावरणाचा संदेश देत ज्ञानोबा माऊलींच्या वारीत मार्गक्रमण करीत आहे. सुमारे १५० युवक-युवती वारीत सहभागी झाले आहेत. वारीतील त्यांचे हे सातवे वर्ष आहे. ५५० ठिकाणी दिंडी मार्गावर त्यांनी झाडे लावली.


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *