👁 10 Views

पत्नी, मुलगी झोपली असताना तरुण शिक्षकाने घेतला गळफास, अपयशाला कंटाळत आत्‍महत्‍या

औरंगाबाद –मी जीवनात अपयशी ठरलो, असा मृत्युपूर्व चिठ्ठीत उल्लेख करून एका शिक्षकाने पत्नी, मुलगी बैठक खोलीत झोपली असता, दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हमालवाडा भागात घडली. निशिकांत रामलाल कलाल (४०, रा अमृतसाई प्लाझा, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) असे मृताचे नाव आहे.
सोमवारी दुपारी त्यांची पत्नी सहा वर्षांची मुलगी घरात झोपल्या होत्या. दरम्यान, निशिकांत यांनी बेडरूममध्ये फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. वजनाने ओढणी फाटल्यामुळे ते जमिनीवर पडले. आवाजाने त्यांच्या पत्नीला जाग आली. त्या बेडरूमकडे गेल्या असता निशिकांत मृतावस्थेत पडलेले आढळले. त्यांनी ही बाब शेजाऱ्यांच्या मदतीने सातारा पोलिसांना कळवली. निशिकांत यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांना निशिकांत यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यामध्ये “वारंवार अपयश येत असून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर आहे.
निशिकांत मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचे रहिवासी होते. बारा वर्षांपासून ते औरंगाबादेत राहत होते. त्यांनी पुण्यात बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतले होते. औरंगाबादेतही त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवले होते. महिन्यांपूर्वी पुण्यात त्यांनी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती समोर आली आहे. सगळ्यांनी मला साथ दिली, मात्र मला यश आले नाही, अशी चिठ्ठी लिहून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहायक फौजदार बी. डी. राठोड करत आहेत.
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *