👁 3 Views

बांगरवाडीत 12 ब्रास वाळूसाठा जप्त, जुन्नर महसूल पथकाचा छापा

 

बेल्हे (ता. जुन्नर);  : बांगरवाडी येथे टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर साठवलेला 12 ब्रास वाळूसाठा हस्तगत करण्यात जुन्नर तहसीलदार कार्यालयाच्या महसूल पथकाला यश मिळाले.


कारवाई सोमवारी (दि. 13) रात्री 9 वाजता करण्यात आली.
वाळूतस्करांकडून बांगरवाडीच्या गणविहीर शिवारातील ओढ्यातून रात्री जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जात होता. त्यानंतर त्या वाळूची ट्रक, हायवा, ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे वाहतूक करून विक्री केली जात होती.


याबाबतची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांना मिळाली. त्यानुसार सबनीस यांनी महसूल विभागाच्या पथकाला संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला. 


त्यानुसार सोमवारी (दि. 13) रात्री 9 वाजता प्रल्हाद पाटील, शिवाजी जाधव, अनिल महाजन, राजेंद्र केदारी, विशाल उत्तर्डे, डी. जी. भोसले, दत्तात्रय लोंढे, राजू बढे यांच्या पथकाने छापा टाकला. या वेळी त्यांना 10 ते 12 ब्रास वाळूसाठा आढळून आला. पथकाने पंचनामा करून तो वाळूसाठा हस्तगत केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *