👁 6 Views

प्रेमात अडकवून विकण्याचा प्रयत्न करत होता….. आरबाजने सुशिलासोबत भयानक कृत्य

 

पवन कुमार राय (साहिगबंज)  : झारखंडमधील साहिबगंज पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री केली.


हळूहळू दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यातून त्या दोघांची जवळीक वाढत गेली. यानंतर मैत्रीचे रुपांतर नात्यांत उतरले. परंतु ज्या तरूणीसोबत तरूण फिरत होता त्या तरुणाचे आधीच लग्न झाले होते. दरम्यान एक दिवशी तरुण आणि तरुणी दोघे एकत्र आले होते यावेळी त्या तरूणीची विक्री होत असल्याचे दिसून आले. ही माहिती त्या तरुणीला समजताच ती तरूणी या सगळ्याला विरोध करत असताना तरुणाने पत्नी आणि मित्रांसह तिची हत्या केली.

ही घटना झारखंडच्या बऱ्हेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजौली गावातील 26 वर्षीय सुशीला हंसदा बाबतीत घडली आहे. दरम्यान या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. देवघरच्या पालोजोरी पोलीस स्टेशन हद्दीतील माथादंगल येथील रहिवासी असलेल्या अरबाज आलमने त्याची पत्नी आणि इतर साथीदारांसह 12 जानेवारी 2022 च्या रात्री त्याची हत्या केली होती. पुरावा लपविण्यासाठी मृतदेह शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पायंगडीह जंगलात नेल्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते.

दरम्यान 13 जानेवारी 2022 रोजी शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. मात्र मृतदेह छिन्नविछीन्न स्वरुपात असल्याने ओळख पटू शकली नव्हती. याप्रकरणी ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर, बारहाईत पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यादरम्यान मृतदेह सुशीला हंसदा यांचा तो मृतदेह असल्याचे आढळून आले.


बऱ्हेत पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी अरबाज आलम, त्याची पत्नी मिसलता तुडू उर्फ ​​रेहिना बीवी, शिकारीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदरा फलन गावातील प्रियंका मुर्मू आणि कोल्हा गावातील साहिल अन्सारी उर्फ ​​थला यांना अटक करण्यात आली आहे.

अरबाज आलम आणि त्याच्या पत्नीला केरळमधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशीला हंसदा यांचा भाऊ जोनास हंसदा याने 5 ऑगस्ट 2022 रोजी बऱ्हेत पोलीस ठाण्यात बहिणीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.


अरबाज आणि त्याची पत्नी मिसलता यांनी मिळून हा कट रचला होता. सुशीला 11 आणि 12 जानेवारीला तिथे आली होती. रात्री उशिरा अरबाज फोनवर कोणाशी तरी बोलत होता. सुशीला 50,000 रुपयांना विकली गेली होती, तर खरेदीदार केवळ 30,000 रुपये देण्यास तयार होता.

सुशीलाने ही गोष्ट ऐकली होती. त्यानंतर तिने विरोध करण्यास सुरू केले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून आरोपींनी सुशीलाच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. मृतदेह दुचाकीवरून शिकारीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पायड्डीह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आला होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *