👁 8 Views

सैराटमधील ‘त्या’ विहिरीत पडून वृद्ध ठार

करमाळा: तालुका प्रतिनिधी
‘सैराट’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या विहिरीत पडून एक वृद्ध ठार झाला आहे. मोहन नामदेव घोगळ (वय 75) रा. राजंणगाव, अहमदनगर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना आज (गुरूवार) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.

बुधवार रात्री वाकडी, अहमदनगर येथील खंडेराव महाराजांची पालखी देवीचा माळ येथील कमलादेवी मंदिर परिसरात मुक्कामास होती. आज पहाटे वारकरी प्रातंविधीसाठी उठले. यावेळी मयत मोहन घोगळ हे वृध्द वारकरीही शौचालयाला येथील विहिर परिसरात गेले. विहीरीजवळुन जात असताना पाय घसरून ते 50 फुट खाली पडले. विहीरीच्या पायरीवर डोके आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. 

या घटनेची माहिती कचरू दगडु गाडवे (रा. राजंणगाव) यांनी अहमदनगर यांनी पोलीसांना दिली. मयत मोहन घोगळ हे एका डोळ्याने अंध असल्याचे समजते आहे. याबाबत पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विलासराव काबंळे व केदारनाथ भरमशेट्टी पुढील तपास करीत आहेत. 
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *