ख्
पंढरपूर दि. 01 :- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्री संत सावता माळी कृषि नगरीमध्ये आयोजित कृषि प्रदर्शनात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी गणपतराव कुऱ्हाडे-पाटील, कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे, माजी सभापती पोपराव रेडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रत्येक महिन्यात लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येत असून यामध्ये शासन सामान्य जनतेसाठी राबवित असलेल्या निर्णयाची आणि विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे आलेल्या वारकरी व भाविकांना व कृषी प्रदर्शनात भेट देणाऱ्या शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी लोकराज्य स्टॉल लावण्यात आला आहे. स्टॉलवर लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार केले जात असून वारकरी, भाविक व नागरीकांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनेकरण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




