पंढरपूर दि. 01 :- आस लागली दर्शनाची या उक्तीप्रमाणे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या संताच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या. तालुका प्रशासनाच्यावतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. तर पंढरपुरात संत मुक्ताईची पालखी दाखल झाली आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पायी मजल दल मजल करुन संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात ठाकूरबुवा समाधी येथे गोल रिंगण झाले. तद्नंतर टप्पा येथे संत ज्ञानेश्वर माऊली व संत सोपानकाका यांची बंधुभेट झाली. बंधुभेटीचा अनुभव वारकरी, भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. बंधुभेटीनंतर माऊलींची पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी भंडीशेगावकडे मार्गस्थ झाली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात तोंडले-बोंडले येथे धावा झाला आणि पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी पिराची कुरोलीकडे मार्गस्थ झाली.





