👁 8 Views

मिथून, कृष्णाबरोबर कॉमेडी करणार ‘सैराट’चा ‘लंगड्या’, सोनी टीव्हीच्या शोमध्ये झळकणार

        

‘सैराट’ चित्रपटाने कुणाला काय दिले याची यादी तयार केली तर ती याद फारच मोठी होईल. या चित्रपटाने परशाची भूमिका करणारा आकाश ठोसर आणि आर्ची साकारणाऱ्या रिंकू राजगुरुला एका रात्रीत स्टार केले. पण या दोघांनाच नव्हे तर चित्रपटात छोट्या भूमिका करणाऱ्या कलाकारांचे आयुष्यही या चित्रपटाने बदलले आहे. असाच एक कलाकार म्हणजे, सैराटमधील लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे.


तानाजीला सोनी टीव्हीच्या नव्या कॉमेडी शोच्या टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे कपिलला टक्कर देण्यासाठी सुरू होत असलेल्या या शोमध्ये आता कृष्णासारखा कॉमेडीयन आणि मिथूनबरोबर लंगड्या स्क्रीन शेयर करणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये तानाजी झळकला आहे. या शोमध्ये बहुतांश कॉमेडियन ‘द कपिल शर्मा शो’मधील कलाकारच आहेत. कृष्णाबरोबर मिथुन चक्रवर्ती, सुगंधा मिश्रा, अली असगर, रिद्दिमा पंडित, संकेत भोसले आणि सुदेश लहरी हे या प्रोमोमध्ये दिसत आहेत. हा शो सोनीच्या मोस्ट पॉप्युलर शो ‘सबसे बडा कलाकार’ ला रिप्लेस करेल.

काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक नवीन शो आणत असल्याचे समोर आले होते. या शोचे नाव आहे, ‘द ड्रामा कंपनी’. हा शो सोनीच्या मोस्ट पॉप्युलर शोपैकी एक असलेल्या ‘सबसे बडा कलाकार’ला रिप्लेस करणार आहे. हा शो जुलैच्या पहिल्या आठवड्यात ऑन एअर जाऊ शकतो. शो प्रिती सिमोस प्रोड्यूस करत आहे. प्रितीने यापूर्वी कपिल शर्माबरोबर काम केले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *