👁 8 Views

चित्रपटाच्या म्युजिक लॉंचने आली मैफिलीला रंगत!

अनिल चौधरी, पुणे :-  

फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या आगामी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ सिनेमाचं म्युजिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. सिनेमाचे निर्माते पी.एस.छतवाल, रिचा सिन्हा, रवी सिंघ त्याचबरोबर स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख, साहील कोपर्डे, स्नेहलता वसईकर, आरश गोडबोले ही स्टारकास्ट आणि लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. इंडस्ट्रीतले इतर अनेक नामवंत कलाकार आवर्जून ह्या सोहळ्यास उपस्थित होते.
या सोहळ्याच्या सुरुवातीलाच “तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी” या रोमँटिक गाण्यावरील गश्मीर-स्पृहाच्या सादरीकरणाने वातावरण गुलाबी केले. त्यानंतर जसराज जोशी आणि श्रुती आठवले यांच्या मधुर आवाजातील “मौनातूनी ही वाट चालली पुढे” तर अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांचे “विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना” या मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी गाण्यांनी मैफिलीला चार चांद लावले. सोहळ्याच्या अखेरीस “तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो” या कोकणी गाण्यावर चित्रपटातील कलाकारांची पावलं थिरकताना दिसली.
‘मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत संगीत दिग्दर्शक हृषीकेश-सौरभ आणि जसराजनी, गीतकार गुरु ठाकूर लिखित “तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो” आणि “विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना” तर वैभव जोशी लिखित “मौनातूनी ही वाट चालली पुढे” आणि “तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी” अशी एकूण ४ गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.
28 जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपले प्रॉब्लेम्स विसरायला लावून “मला काहीच प्रॉब्लेम नाही” म्हणायला लावणारा ठरेल, यात शंका नाही.⁠⁠⁠⁠ “मला काहीच प्रॉब्लेम नाही”

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *