👁 10 Views

‘बसस्टॉप’ चा धम्माल ट्रेलर लाँच

अनिल चौधरी, पुणे :-
मराठी चित्रपट सृष्टीतील देखण्या आणि प्रसिद्ध स्टारकास्टना एकत्र आणणाऱ्या ‘बसस्टॉप’ या आगामी सिनेमाचा डिजिटली ट्रेलर नुकताच लाँच झाला. डीजीटलायजेशन या युगात व्हायरल झालेल्या या ट्रेलरने अल्पावधीतच रसिकांची वाहवा मिळवली आहे. गणराज असोशिएट्स प्रस्तुत आणि रॅपर श्रेयश जाधव निर्मित या सिनेमाचे समीर हेमंत जोशी यांनी दिग्दर्शन केलं असून, हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टीस्टारर  चित्रपटाच्या यादीत गणला जाणार आहे.

सोशल साईटवर रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टिजर पोस्टरएवढीच प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे कॉलेज तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात दोन पिढ्यांची विचारसरणी आणि जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये केला आहे. कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणं, मैत्री ट्रेलरमध्ये दिसून येत असून, दुसऱ्या बाजुला पालकांची मानसिकतादेखील यात मांडण्यात आली आहे. तरुण मुला-मुलींचे पालक आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला किती पटतात, याचा उहापोह यामध्ये दिसून येतो. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे अश्या तरुण कलाकारांचा ताफा यात दिसत असून, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे ज्येष्ठ कलावंतदेखील आपणास या ट्रेलरमध्ये दिसून येतात.

युवा पिढी आणि त्यांचे पालक यांच्यातील वैचारिक दरी आणि त्यावरून होणारे वाद अगदी विनोदी ढंगात या ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहे. ‘बसस्टॉप’ या सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीसाठी पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी यां तिघांनीदेखील महत्वाची भूमिका निभावली असून, घराघरात होत असलेल्या जनरेशन गेपच्या कुरघोडी सिनेमात केमेऱ्याद्वारे कैद करण्याचे काम छायाचीत्रकार अभिजित अब्दे यांनी केले आहे.  हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *