अकोला: दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज येथे लग्नघरी जात असतांना वाई फाट्याजवळ आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अपघातात पती-पत्नीचा आणि २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर, दोन गंभीर जखमी झाला आहे
अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर लागलीच रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने आकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून यासंदर्भात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



