सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !
12 Jul. 2017
सेलिब्रिटींच्या सौंदर्याचे गुपित म्हणजे घरगुती उपाय होय. चला जाणून घेऊया त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोणते घरगुती उपाय कराल.
बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे सौंदर्य पाहून कोणत्याही मुलीला त्यांचा हेवा वाटू शकतो. एवढी सुंदर त्वचा आपलीही असावी आणि आपणही त्यांच्यासारखे सुंदर व आकर्षक दिसावे असे न वाटणे अशक्यच. कारण प्रत्येक महिलेस असे वाटते की, आपण नेहमी तरुण आणि सुंदर दिसावे. आपणास कदाचित माहित नसेल की सेलिब्रिटींच्या या सौंदर्याचे गुपित म्हणजे घरगुती उपाय होय. चला जाणून घेऊया आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोणते घरगुती उपाय कराल.
* एक चमचा मुलतानी माती, एक चमचा टोमॅटोचा गर किंवा एक चमचा तुरटी घेऊन या तिघांना एकत्र करुन पेस्ट तयार करावी. या पेस्टला चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावावी. १० मिनिटानंतर थंड पाण्याने धुवावी. या प्रयोगानेही मोकळे रोमछिद्रे संकुतिच होतात.
* एक चमचा काकडीचा रस, एक अंड्याचा पांढरा बलक, एक चमचा लिंबूचा रस किंवा चिमूटभर काळी मिरी घेऊन तिघांना चांगल्याप्रकारे एकत्र करा. या पेस्टला चेहऱ्यावर उटण्यासारखे लावावे. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे मोकळे झालेले रोमछिद्रे बंद होण्यास मदत होते.
* एक चमचा गुलाबजल, अर्धा चमचा काकळीचा रस आणि थोडीशी शुद्ध बेन्जोइन घेऊन तिघांना चांगल्याप्रकारे एकत्र मिसळा. या मिश्रणाने चेहरा चांगला स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्याची स्वच्छता तर होतेच शिवाय रोमछिद्रे संकचितदेखील होतात.
* मोकळ्या रोमछिद्रयांवर स्ट्रॉबेरीचा गर लावावा. हा प्रयोग मोकळ्या रोमछिद्रांच्या समस्येवर प्रभावी उपाय आहे.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा










