आयसीआयसी बँकेत निवड
पंढरपूर: दि: पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आयसीआयसी बँकेच्या वतीने सेल्स ऑफिसर पदासाठी कँम्पस इंटरव्ह्यूवचे आयोजित करण्यात आले होते. कँम्पस इंटरव्ह्यूवमध्ये ५४ विद्यार्थ्याची सेल्स ऑफिसर पदासाठी निवड करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांनी मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाबद्दल अपार श्रद्धा ठेऊन कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास जीवनात रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात. आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कँम्पस इंटरव्ह्यूवसारखे उपक्रम सातत्याने राबवीत आले आहे. याचा लाभ होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.” यावेळी आयसीआयसी बँकेचे सिनिअर एक्सिक्युटीव्ह मा. विवेक आजमाने यांनी बँके व प्लेसमेंट बद्दल मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर मा. विवेक आजमाने, भरती कार्यकारी अधिकारी श्रीमती रसिका पवार, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील , प्रा. ए. आर. पाटील, प्लेसमेंट सेल समितीचे चेअरमन डॉ. सुशील शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील व पंढरपूर परिसरातील बी.ए., बी. कॉम, बी. एस्सी., बी. सी. ए. पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी आयसीआयसी बँकेमार्फत कँम्पस इंटरव्ह्यूव घेण्यात आला. त्यातून ५४ विद्यार्थ्याची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. प्राचार्य, उपप्राचार्य शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुशील शिंदे यांनी केले. यावेळी प्रा. एस. पी. शहाणे, प्रा. राजेंद्र मोरे यांनी सदर उपक्रमास सहाय्य केले. आभार डॉ. एम. के. पांचाळ यांनी मानले.









