👁 10 Views

विक्रम शिरसट मित्र मंडळाचा उपक्रम पालवी मधील विद्यार्थ्यांनी घेतला खेळांचा आनंद

विक्रम शिरसट मित्र मंडळाचा उपक्रम 

पालवी मधील विद्यार्थ्यांनी घेतला जायंट व्हिलसह विविध खेळांचा आनंद

  येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलीत पालवी या संस्थेतील बालकांना आज विक्रम शिरसट मित्र मंडळाच्या वतीने येथील टिळक स्मारक मंदीराच्या प्रांगणात असलेल्या जायंट व्हिलसह विविध खेळांचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती.यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी उपस्थित बालकांचे स्वागत केले.
        कुणाची आसमंतात उंचच उंच जाणार्‍या पाळण्यात बसण्यासाठी धडपड तर कोणाची खोल   गोलातील भरधाव चालविली जाणारी मोटार सायकल पाहण्यासाठी पळापळ,कुणाला छोटया पाळणयत बसुन आपला आनंद साजरा करावा वाटला तर कुणाला येथे उपलब्ध असलेल्या सगळ्याच खेळण्याचा आस्वाद घ्यावा असे वाटल्याने मोठी धावपळ करीत ते आनंद लूटत होते.त्यांच्या चेहर्‍यावर निर्माण झालेले आनंद भाव टिपत विक्रम शिरसट मित्रमंडळाचे कार्यकर्तेही अगदी रमून गेले होते.प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या डिंपल घाडगे व कर्मचारी हेही यावेळी या बालकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून हरखून गेले होते.
       याबाबत बोलताना नगरसेवक विक्रम शिरसट म्हणाले की,टिळक स्मारक मैदान येथील या खेळाच्या विविध साधनांचा आस्वाद या बालकांनी घ्यावा अशी आमची इच्छा होती.त्यासाठी आम्ही डिंपल घाडगे यांच्याशी संपर्क केला.आज या बालकांच्या चेहर्‍यावरील आनंद अम्हास मोठे समाधान देवून गेला आहे.यावेळी रमेश शिरसट,माउली अधटराव,गोविंद खराडे,किरण माने,बबलू झिंर्जुटे यांचेसह विक्रम शिरसट मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.   
  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *