👁 6 Views

महर्षी वाल्मिकी संघाकडून कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना प्रतिकात्मक फाशी..!

पंढरपूर (प्रतिनिधी) :- कोपर्डी येथील निर्भयावर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणार्‍या सैतानी विकृतीच्या आरोपींना महर्षी वाल्मिकी संघाने चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये ‘प्रतीकात्मक फाशी’ दिली. निर्भयाची हत्या घडून एक वर्ष उलटून गेले तरी निर्भयाला न्याय मिळाला नाही. याचा निषेध व्यक्त करत ही प्रतीकात्मक फाशी देण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने निर्भयास भावपुर्ण श्रध्दांजलीही अर्पण केली. 

कोपर्डी हत्याकांड प्रकरण घडल्यापासून यातील आरोपींबद्दल सर्वत्र प्रचंड असंतोष खदखदत आहे. या घटनेचा विरोध संपुर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. कोपर्डी हत्याकांडातील आरोपींनी माणुसकीला काळीमा फासणारे व पशुलाही लाजवणारे दुष्कृत्य केले आहे. या आरोपींनी एका निष्पाप मुलीचीच हत्या केली असे नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील साधुसंतांच्या शिकवणुकीची व महामानवांच्या विचारांचीही हत्या केली आहे. या आरोपींना कठोरात कठोर शासन दिले तरी त्यांच्या अपराधाला ही शिक्षा कमीच आहे. या घटनेतील सर्व आरोपींना भर चौकामध्ये मरेपर्यंत फाशी दिली जावी. अशी मागणी प्रथमपासूनच महर्षी वाल्मिकी संघाकडून करण्यात आलेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही निंदनीय घटना घडून आज एक वर्ष झाले तरी सुध्दा यातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. ही बाब निषेधार्ह आहे. याचा आज आम्ही चंद्रभागेच्या पात्रात यातील आरोपींच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना फाशी देऊन जाहीर निषेध व्यक्त केला व निर्भयास भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.  अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
चंद्रभागेच्या पात्रात निर्भयास श्रध्दांजली अर्पण करताना गणेश अंकुशराव, बबलु बोराळकर, निलेश माने, अरुण कांबळे, महावीर अभंगराव, सुनील कोताळकर, सोन्या माने, रामभाऊ कोळी, वैभव अभंगराव, प्रवीण कांबळे, सुरज कांबळे, रोहित नेहतराव, लहु कांबळे, संजय पगारे, शरद कोरे, अप्पा करकमकर.
  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *