👁 8 Views

आईनेच केले असे लाजिरवाणे काम, मुलगी म्हणाली- पप्पा तुमच्या दोन्ही मुली बरबाद ..!

आईनेच केले असे लाजिरवाणे काम, मुलगी म्हणाली- पप्पा तुमच्या दोन्ही मुली बरबाद ..!

16 Jul.2017


मुलीवर तिच्या आईच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांसह गँगरेप केला.
एटा – यूपीच्या एटा जिल्ह्यात एका मुलीने आईवर 20 लाख रुपयांत विकल्याचा आरोप लावला आहे. मुलगी म्हणाली, आईच्या समोरच तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. प्रकरण 22 डिसेंबर 2016चे आहे. मुलीचे म्हणणे आहे की, तिची लहान बहीण 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिच्या आईने तिलाही विकले आहे. शुक्रवारी मारहरा पोलिस स्टेशनमध्ये आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, मुलीने जबाबात सांगितलेली तिच्यावरील भीषण अत्याचाराची कहाणी…

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
रडत-रडतच सांगितली आईच्या कृत्याच्या कहाणी
– एएसपी संजय कुमार म्हणाले की, मुलीच्या तक्रारीवरून आई आणि तिच्या कथित प्रियकराचा शोध सुरू आहे. मुलीची एक बहीणही 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे, तिचाही शोध घेतला जात आहे. जेव्हा…

मुलीने तिला न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
– मुलीने सांगितले की, 8 वर्षांआधी आईने आपल्या प्रियकर नसीम राजासह राहण्यासाठी घर सोडले. 9 महिन्यांआधी ती परत आली आणि वडिलांची माफी मागून आमच्यासोबत राहायला लागली.
– 22 डिसेंबर 2016 रोजी जेव्हा वडील कामावर गेले होते, तेव्हा आईने तिचा प्रियकर आणि त्याच्या 4 साथीदारांना घरी बोलावले. त्यांनी विचारले- दोन्ही मुलींची किंमत काय आहे, यावर आई म्हणाली- 20 लाख! मग…

पोलिस याप्रकरणी गुन्हा नोंदवून मुलीची आई, तिचा प्रियकर आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
– यानंतर त्या सर्वांनी रात्री दारू घेतली आणि पार्टी केली. रात्री दोन्ही बहिणींवर बळजबरी केली. दिवस उजाडताच आम्हाला गाडीत बळजबरी बसवून घेऊन गेले.
माझे बोलणे ऐकून दंग झाले पप्पा
– एका ढाब्यावर गाडी थांबवून ते सर्वजण जेवण करू लागले. संधीचा फायदा घेऊन मी कशीबशी तिथून पळाले. मी पप्पांना फोन केला- तुमच्या दोन्ही मुलींची जिंदगी बरबाद झाली आहे. हे सर्व दुसरे कुणी नाही तर तुमची बायको आणि माझ्या आईने केले आहे. मी पप्पांना आईच्या या कृत्याबद्दल सारेकाही सांगितले. माझे बोलणे ऐकून पप्पांना काहीच सुचेनासे झाले.
– यानंतर एक माहिती मिळाली की त्या लोकांनी बहिणीला दिल्लीला नेले आहे. आम्ही तिथे तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. सहा महिन्यांपासून आम्ही बहिणीचा शोध घेत आहोत. आता कळले आहे की, तिला नोएडाच्या जेवर परिसरात डांबलेले आहे.
– आईने माझ्या बहिणीला विकले आहे आणि दररोज तिच्यावर रेप होत आहे. मला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
– शुक्रवार, 14 जुलै रोजी मुलीने आपल्या वडिलांसोबत एसएसपी यांच्याकडे तक्रार नोंदवली. यानंतर याप्रकरणी मुलीची आई मीना देवी, नसीम राजा ऊर्फ गोल्डी, दीपक कुमार, लोकेश कुमार आणि रामेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जा
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *