सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. लग्नाचेही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सदर व्हिडीओमध्ये नवरा नवरीची वरात घोडा किंवा गाडीवरुन काढली नाही तर चक्क गाढवावरुन काढली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय झालाय.
व्हिडीओमध्ये नवरा-नवरी चक्का गाढवावरुन येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरा नवरी एका गाढवगाडीवर बसले आहेत तर गाढव ही गाडी खेचतो आहे त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. विशेष म्हणजे गाढवावरून एंट्री करताना नवरा-नवरी खूप उत्साहीत दिसत आहे.
हा व्हिडीओ पाकिस्तान मधील असल्याचा बोलले जात आहे. @pakistan_glitz इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर कमेंट करत आहे. पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती ढासळल्याने नवरा नवरीवर गाढवावरुन वरात काढायची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.



