👁 11 Views

‘महिला तस्करी’ विषयावर मुंबईत 27 जुलैपासून आंतरराष्ट्रीय परिषद – विजया रहाटकर

मुंबईदि२० : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनयांच्या संयुक्त विद्यमाने २७  २८ जुलै रोजी मुंबई येथे महिलांची तस्करी’ या विषयावरआंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला आयोगाच्याअध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत मानवी हक्कबाल हक्कमहिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे२० हून अधिक देशातील साधारण १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेतराज्यातील तसेचदेशातील संबंधीत मंत्रीविविध आयोगांचे अध्यक्षसचिवया क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवीसंस्थांचे प्रतिनिधीतज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेतपरिषदेत  दिवस या विषयावरसमग्र चर्चा होऊन ही अमानवी प्रथा रोखण्यासाठी एक फोरम तयार करण्यात येईलतसेचविविध उपाययोजना सुचविण्यात येतीलअशी माहितीही श्रीमती रहाटकर यांनी यावेळी दिली.जुहू येथील जे.डब्ल्यू. मॅरिएट येथे ही परिषद होईल.
श्रीमती रहाटकर म्हणाल्यतस्करीसारखे कृत्य अत्यंत संघटित आणि नियोजनबध्द पध्दतीने कोणत्याही सीमेचे बंधन न बाळगता राबविले जात असल्यामुळे या गोष्टीची चर्चा जागतिक पातळीवर होणे आवश्यक झाले आहे. देशभरात साधारण २७ लाखमहिला ह्या देहविक्रीसह इतर अवैध व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेतमहिलांच्या होणाऱ्यातस्करीतून दरवर्षी साधारण ३० हजार महिला या दुर्दैवी क्षेत्रात ढकलल्या जातातहेरोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेतत्याचाच एक भाग म्हणून राज्य महिलाआयोगाने हा पुढाकार घेतला असून देशात प्रथमच या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचेआयोजन करण्यात आले आहे.  
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत तीन पूर्ण सत्र आणि पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील वक्त्यांचा समावेश असलेल्या चर्चासत्रांचा समावेश असणार आहे. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये महिला तस्करी संदर्भातील प्रत्यक्ष घडणारे गुन्हे आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम याविषयी चर्चा होईल27 जुलै रोजी होणाऱ्या चर्चासत्रामध्ये तस्करी,महिलांवर होणारे अत्याचार व त्यामागील वास्तव आणि त्याचे परिणाम या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चर्चासत्रामध्ये मानवी तस्करीसारखे गुन्हे रोखणे व त्याविरूध्द लढणे आणि त्याबरोबरच राज्याचा विकासावर तस्करीमुळे होणारा परिणाम या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.
28 जुलै रोजी मानवी तस्करी विरूध्द लढणे आणि त्याला नष्ट करण्यासाठी घेण्यात आलेल पुढाकार यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यांतील पहिले चर्चासत्र मानवी तस्करीला प्रतिबंध करणारे कायदे आणि न्यायव्यवस्था उभी करण्याबाबत असेल. दुसरे चर्चासत्र मानवी तस्करीतून बचावलेल्या व्यक्ती आणि या चळवळीत सहभागी होणाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या भाषणांचा समावेश असणार आहे. हे सर्वजण मानवी तस्करीला बळी पडलेल्यांना पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याबाबतीत आणि समाजात स्थान मिळवून देण्याबाबतीत आपले  विचार व्यक्त करणार आहेत. या तीनही चर्चासत्रात मिळून मानवी तस्करी संबंधातील गुन्हेगारीसायबर ट्रॅफिकिंग आणि तस्करी विरोधात माध्यमांची भूमिका याबाबतीत प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यांतील अखेरचे सत्र महिलांच्या तस्करीला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल यावरील चर्चेने होणार आहे.
परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरीराज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारमुख्य सचिव सुमित मल्लितेलंगणाचे पोलिस आयुक्त महेश भागवतराज्याचे पोलिस महासंचालक सतश माथूरमुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकगोव्याचे डायरेक्टर जनरल मुक्तेश चंदेरगोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा,आयटीपीएचे माजी दंडाधिकारी स्वाती चौहान हे या परिषदेत संवाद साधणार आहेत. 

तसेचया चर्चासत्रात भाग घेणाऱ्या प्रमुख वक्त्यांमध्ये आयजेएमचे मुख्य अधिकारी गॅरी हॉगेनघानाच्या समिरा बाऊमियाफिलिपिन्स पोलिस दलाच्या लिबोरिओ कॅराबॅक्कन,केनिया पोलिस दलाच्या बाल संरक्षण विभागाच्या अधिक्षक ग्रेस एनजोकीएन्डीरांगो,बोलिव्हीयाच्या पोलिस दलाचे कर्नल जॉनी अ‍ॅग्वीलेराकंबोडियाच्या आंतरराष्ट्रीय मायग्रेशन विभागाचे मेंगलांगकेंगब्राझीलचे लोकप्रतिनिधी डेपुटाडो कार्लोस बेझेराफिलिपिन्सच्या मानवी तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख जेनेट फ्रांसिस्कोथायलंडचे अँटी ट्रॅफिकिंग इन पर्सन्स डिव्हिजनकडून लेफ्टनंट कर्नल अरूण प्राँफनरिस्पॉन्सिबल फॉर सोर्सिंग ऑपरेशन्स वॉलमार्टचे सुनल जेकबप्रज्वलाच्या डॉ. सुनता कृष्णन हे उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  





























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *