👁 9 Views

आदिम विकास परिषदेच्या वतीने मंदीर समितीचे नुतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना निवेदन चंद्रभागेच्या पात्रात कायमस्वरुपी जिवन रक्षक नियुक्त करा,सुसज्ज रुग्णालय उभारा आदी मागण्या

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

आदिम विकास परिषदेच्या वतीने मंदीर समितीचे नुतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना निवेदन
  चंद्रभागेच्या पात्रात कायमस्वरुपी जिवन रक्षक नियुक्त करा,सुसज्ज रुग्णालय उभारा आदी मागण्या    
 चंद्रभागेच्या पात्रात अवैध व गाढवाद्वारे वाळू ूउपशामुळे पडलेल्या खड्डयात बुडुन अनेक भाविकांचा बळी जातो.मंदीर समितीच्या वतीने यात्रा कालावधीत येथे समितीच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात जिवन रक्षक नियुक्त केले जातात.तरी या ठिकाणी समितीच्या वतीने चार जिवन रक्षक व एक होडी चालक यांची नियुक्ती करावी.व यासाठी परपंरागत कोळी समाजातीलब युवकांना प्राधान्य द्यावे. पंढरपूर नगर पालीकेच्या रुग्णालयाची मोठी सुसज्ज इमारत धुळघात पडून आहे.या ठिकानी सोईसुविधा नसल्याने उपचारासाठी भाविक व नागरिक जात नाहीत तरी मंदीर समितीने हा दवाखाना ताब्यात घेवुन या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारावे.हजारो वयोवृध्द भाविक चार्तुमासानिमित्त पंढरीत राहुन भजन,किर्तन,हरिपाठ,काकडा,प्रदक्षिणा आदी करत असतात.या भाविकांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मंदीर समितीच्या वतीने चार महिने चार्तुमासाच्या कालावधीत भाविकांच्या सोईसाठी एक वैद्यकिय पथक नियुक्त करुन या भाविकांना उपचाराची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशा आशयाचे निवेदन  आदिम विकास परिषदेच्या मंदीर समितीचे नुतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना दिले आहे.
                     मंदीर समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार गुरुवारी स्विकारल्यानंतर शुक्रवारी मंदीर समितीच्या नुतन सदस्यांच्या पहील्याच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आदिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटरावव परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्याशी संवाद साधून आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली व समितीच्या कारभारात आम्ही पुर्णपणे सहकार्याची भुुमिका घेणार असल्याचे सांगीतले.या वेळी त्यांनी समितीच्या माध्यमातून अपेक्षीत असलेल्या विविध उपक्रमाबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.हे निवेदन देताना दादा चव्हाण,गोलू लकेरी,विदुल अधटराव,नितिन पानकर,धिरज परचंडराव,विजय सुरवसे,नरेश जवंजाळ,सुनिल हिरणवाळे,विलिन परचंडराव आदी उपस्थित होते. 

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


















  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *