👁 12 Views

युटोपियन शुगर्स म्हणजे ऊस उत्पादकांशी बांधिलकी ठेवणारा कारखाना ; डॉ :धर्मेंद्रकुमार फाळके

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 



युटोपियन शुगर्स म्हणजे ऊस उत्पादकांशी बांधिलकी ठेवणारा कारखाना ; डॉ :धर्मेंद्रकुमार फाळके 


              फुलचिंचोली :युटोपियन हा ऊस उत्पादकांशी बांधिलकी ठेवणारा कारखाना असून या कारखान्याने आजच्या ऊस पीक परिसंवादमध्ये “१०० टन प्रति एकर ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान” हा विषय घेऊन हि बांधिलकी सिद्ध केली आहे . ऊस उत्पादकांचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर शेती मधून प्रति एकर उत्पादकता वाढली पाहिजे . यासाठी काळाची पाऊले ओळखून यूटोपियन  शुगर्स ने उचलेले पाऊल हे अभिनास्पद असल्याचे मत माहाराट्र ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चे मुद्रपदार्थ विज्ञान वेता डॉ :धर्मेंद्रकुमार  फाळके यांनी व्यक्त केले . 
               प्रारंभी ,पांडुरंग परिवाराचे कुंटुंब प्रमुख मा . श्री . सुधाकरपंत परिचारक, विधान परिषद सदस्य मा. श्री . प्रशांतराव  परिचारक, यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून परिसंवादचे उदघाटन करण्यांत आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक  युटोपियनचे कार्यकारी संचालक मा . उत्तमराव पाटील यांनी केले.
सदर प्रसंगी युटोपियनचे संस्थापक चेअरमन श्री . उमेशराव परिचारक म्हणाले कि श्री पांडुरंग कारखान्या कडील अतिरिक्त ऊसाचा  प्रश्न मार्गी लागावा  या करीता पांडुरंग परिवारानेच युटोपियन शुगर्सची उभारणी केली आहे . युटोपियन ने मागील ३ हंगामामध्ये केलेली कामगीरी समाधानकारक असून ऊस उत्पादकांच्या कल्याणासाठी युटोपियन भविष्यात आणखी नवनवीन योजना राबविणार आहे. 
            पुढे बोलताना श्री . फाळके म्हणाले कि ऊस शेती हि महाराट्राची सदन शेती आहे . या शेतीला ३५०० वर्षापासूनचा इतिह्यास आहे . साधू संतांनी आपल्या अभंगांमधून अनेक ठिकाणी ऊसाचा उल्लेख केलेला आहे . असे सांगून त्याने मुखोद्गत असलेले अभंग ऊस उत्पादकांना ऐकून दाद मिळवली . खऱ्या अर्थाने उसाची शेती करून उत्पादन वाढवायचे असेल आणि ते ही कमीत कमी खर्चात तर आपल्या विचार सरणीत बदल केला पाहिजे . पारंपारिक ऊस शेती झुगारुन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे . ‘ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संतांच्या उक्तीप्रमाणे आपण लागवड करीत असलेल्या ऊसाची  जात आपण अभ्यासली पाहिजे . वर्षानुवर्ष ज्या जमिनीतून आपण पीक घेत आहोत त्या काळ्या आईची कधीतरी तपासणी करण्याच्या उद्देश्याने माती तपासणी करणे गरजेचे आहे . माती परिक्षानंतर जमिनीचा पोत सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची मात्रा आपण जर दिली व योग्य पाण्याचे नियोजन केले तर एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेणे आपणास अशक्य नसल्याचे मत श्री फाळके यांनी वेक्त केले . 
              जैन एरिगेशनचे एरिया मॅनेंजर मा . दिलीप पांगुळ म्हणाले कि पाण्याचा अपव्यवय टाळून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचे ऊस उत्पादन घेण्यासाठी जैन एरिगेशनचे नवनवीन तंत्रज्ञान उस उत्पादकांनी आत्मसात करावे .
या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था परिचारकांचे खंदे समर्थक श्री . नागनाथ मोहिते व पांडुरंग परिवार फुलचिंचोली यांनी अतिशय शिस्त बद्द  भोजनाची सोय केल्याबद्दल पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री . सुधाकरपंत परिचारक यांनी श्री . मोहिते याना धंन्यवाद दिले . 
                सदरच्या कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग सह . चे . मा . चेअरमन श्री दिनकर भाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा . सभापती दाजी पाटील ,मा . उपसभापती लक्ष्मण तात्या धनवडे , मोहोळ तालुक्याचे जेष्ठ  नेते मानाजी माने , सरी श्री पांडुरंग चे मा . व्हा . चेअरमन दिलीप चव्हाण , संचालक सुरेश आगावणे , कालिदास रणदिवे ,अंगदमास्तर  तुंगत, बाळासाहेब अरकिले ,कृषी उत्पन्न बाजार समिती चे  सभापती दिलीपआप्पा घाडगे , उपसभापती विवेककाका कचरे , संचालक मोहन खरात , रघु गोडसे , प्रभाकर आप्पा भोसले , मा .जि.  प . सदस्य बाळासाहेब देशमुख , पंचायत समिती सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे , उपसभापती अरुण घोलप , पं . स .सदस्य माउली चव्हाण , गोपाळपूर पं . स . सदस्य बंगाले , राजेंद्र पाटील , सत्यवान देवकुळे , दादासाहेब मोटे , भीमा सह . सा . का . चे माजी संचालक चंद्रकांत थिटे , कालिदास रणदिवे , राजूबापू गावडे , रतिलाल गावडे , शिवाजी चव्हाण आदी उपस्थित  होते . 
                कार्यक्रमाचे सूत्र संचालन सेल अकाऊंटंट लक्षमण पांढरे यांनी केले . तर आभार कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी मानले . 
फोटो ओळी :-
१) उस पीक  परिसंवादाचे  दीप प्रज्वलन  व प्रतिमा  पूजन  करून  उद्घाटन  करताना पांडुरंग परिवाराचे कुंटुंब प्रमुख मा . श्री . सुधाकरपंत परिचारक, विधान परिषद सदस्य मा. श्री . प्रशांतराव  परिचारक यांचे समवेत  संस्थापक  चेअरमन  श्री उमेश परिचारक, कार्यकारी संचालक मा . उत्तमराव पाटील यांनी,जैन एरिगेशनचे एरिया मॅनेंजर मा . दिलीप पांगुळ, कोठारी ऍग्रोटेक चे ऍग्रोनॉमी हेड रमाकांत गोळे , दिनकर भाऊ मोरे , दाजी पाटील ,मानाजी माने , दिलीप अप्पा घाडगे ,लक्ष्मण तात्या धनवडे  आदी दिसत आहेत . 

२) आपल्या आक्रमक पण खास शैलीत अभ्यास पूर्ण “१०० टन प्रति एकर ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान” या विषयावर मार्गदर्शन करताना मृदपदार्थ विज्ञानवेत्ता ,महाराट्र ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चे डॉ :धंमेंद्रकुमार फाळके साहेब                            Yours Faithfully

                                                                  L.B.Pandhare,
                                                                 Sale Accountant
                                                                Utopian Sugars Ltd.,
                                                        Kacharewadi Tal MangalwedhaContact No .7720068674

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *