पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application
मुंबई. दि, 1 : मुंबईतील आरे फिल्टरपाडा येथील दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचारा संदर्भात चुकीचा वैद्यकिय अहवाल प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. असे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नियम 93 अन्वये सदस्य श्रीमती निलम गोऱ्हे यांनी मुद्या उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना श्री. पाटील बोलत होते.
अहमदनगर मधील तिसगाव येथिल मुलगी आणि मुंबईतील आरे फिल्टरपाडा येथील मुलांच्या बाबतीत घडलेली घटना ही अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी अहवाल देणाऱ्या डॉक्टरांची आणि या गुन्ह्या संदर्भात संबंधित असणाऱ्या सगळयांची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच ज्या डॉक्टरांनी चुकीचा शवविच्छेदन अहवाल दिला आहे. त्यांची शैक्षणिक अर्हता, त्यांनी दिलेला अहवाल आणि त्यांना असलेले अधिकार हे सर्व तपासून पाहण्यात येईल. अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.
……………………………………………………………………………………………………………………..
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




