👁 7 Views

खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या वास्तुविशारदावर कारवाई करण्यात येईल – नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

मुंबई,दि.1 ईमारत बांधतांना भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे उंचीसंदर्भातील खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कथीत वास्तुविशारद तेजस शहा आणि या प्रकरणात मदत करणाऱ्या यंत्रणेतील सर्व अधिकरी यांची चौकशी करुन लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.
   उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नियम 93 अन्वये विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुद्या उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना श्री. पाटील बोलत होते.
सदर प्रकरणामध्ये वास्तुविशारद तेजस शहा यांनी विमानतळ प्राधिकरणाचे बोगस प्रमाण पत्र महानगरपालिकेकडे सादर करुन बांधकामाची परवानगी घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यांना बृहमुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही स्वरुपाचा प्रस्ताव सादर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणामध्ये ईमारत प्रस्ताव विभाग आणि म्हाडाच्या बांधकाम विभागाचे संबधित असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

……………………………………………………………………………………………………………………..

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *