👁 7 Views

पालखी मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्याची मागणी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 4 August 2017

 पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू या पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केंद्रीय रस्ते विकास व भुपृष्ठ परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे बुधवारी दिल्ली येथील वाहतूक भवन येथे भेटून करताना भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर.
नवी दिल्ली/पंढरपूर : उभ्या महाराष्ट्रात पंढरपूरला तीर्थक्षेत्र पंढरपूर म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्षभरात लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू या पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस संजय वाईकर यांनी बुधवारी एका लेखी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते विकास व भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील वाहतूक भवन येथे समक्ष भेट घेऊन केली आहे.
आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रांसाठी लाखो भाविकांची मांदियाळी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. पंढरपूर शहरातील विविध सोयीसुविधा पुरवतानाच त्यांच्या मार्गावरील अडथळेही दूर करण्याची गरज असल्याने शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात योजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला लवकरात लवकर सुरूवात होऊन हे काम पंढरपूर येथूनच सुरू होण्याचीही मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
त्याचप्रमाणे शेगावहूनही पंढरपूरकडे येणार्‍या गजानन महाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामास हिरवा कंदिल मिळाला असून त्या कामाचे उद्घाटन जालना जिल्ह्यातील वाटूरफाटा याठिकाणी नुकतेच झाले आहे. आता पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू याही रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत श्रीक्षेत्र पंढरपूर येथून केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालखी मार्ग आणि वाहन रस्ते एकच असल्याने रस्त्यावरून येणारी-जाणारी वाहने वारकर्‍यांच्या दिंड्यांमध्ये घुसण्याचे अनेक प्रकार पूर्वी घडले आहेत. काही वर्षांपूर्वी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी येत असताना या दिंडीत ट्रक घुसल्याने 11 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जन्माचे सार्थक व्हावे, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक पंढरीत वारीसाठी येतात. अशा विठ्ठल भक्तांना रस्ते अपघातात  दुर्दैवीरित्या मरण यावे, ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे.
पालख्यांचे आगमन पंढरपूरकडे होत असताना अशा अनेक घटना वाहतुकीसाठी व पालख्यांसाठी एकच रस्ता असल्याने घडत आहेत. यामुळे पालखी मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे ते पंढरपूर हा रस्ता ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे येत असताना अत्यंत गजबजलेला असतो.
या काळात पुणे येथून होणारी एस.टी.ची वाहतूक बारामती-इंदापूर मार्गे वळवून पंढरपूरकडे होत असते. अनेकदा दिंड्यांच्या प्रचंड गर्दीमुळे एस.टी.बसेसना रस्ता मिळत नसल्याने त्या रस्त्यातच खोळंबून थांबलेल्या दिसून येतात. यासाठी आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर असा वेगळा चौपदरी पालखी मार्ग लवकरात लवकर होणे ही काळाची गरज आहे.
दरम्यान आषाढी यात्रा सोडून कार्तिकी व माघी यात्रेला असंख्य वारकर्‍यांच्या दिंड्या आपापल्या गावाहून पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून अशा दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने पंढरपूरमध्ये येणार्‍या सर्वच मार्गांचे चौपदरीकरण होण्याची गरज निर्माण होणार आहे. वारकर्‍यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये दिवसेंदिवस मोठा उत्साह व भक्तीभाव वाढत चालला आहे. त्यामुळे पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू या मार्गाच्या कामास लवकरात लवकर सुरूवात व्हावी, अशी आग्रही मागणी वाईकर यांनी केली आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *