पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 5 August 2017
भटूंबरे येथील शिक्षण परिषदेत बोलताना जि.प.सदस्य मा. सुभाषराव मानेसर,केंद्रप्रमुख डाँ.एन.टी.भोसले,विक्रमसिंह माने, उत्तम लवटे,उत्तम कोकरे,सखाराम बागल,राखी चव्हाण
जि.प. शाळेतील प्राथमिक शिक्षण हे सुसंस्कारीत आयुष्याचा पाया -प्रा. माने
पंढरपूर
जि.प.शाळेतील शिक्षण हे सुसंस्कारीत आयुष्याचा पाया असून प्राथमिक शिक्षक माऊलीचे काम करतात. म्हणूनच शिक्षण व्यवस्थेचा कळस चढून आदर्श नागरिक तयार होतो, असे मत जि.प.सदस्य प्रा. सुभाषराव माने यांनी व्यक्त केले.
सरुबाई विद्यालयात झालेल्या बाभुळगाव केंद्रातील शिक्षण परिषदेत बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डॉ.नामदेव भोसले होते. यावेळी बोलताना प्रा. सुभाष माने यांनी, मी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असून मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उत्तम कोकरे, सूत्रसंचलन विजय राऊत तर आभार प्रशांत वाघमारे यांनी मानले.
यावेळी माजी विद्यार्थी कृतज्ञता मेळावा, टँलेंट फाँर टेस्ट परीक्षा, आदर्श शिक्षक-विद्यार्थी निवड, शिक्षक प्रेरणा अभियान, पायाभूत चाचणी याविषयांवर चर्चा करण्यात आली. शाळासिद्धी या विषयावर सिद्धनाथ लेंगरे व प्रशांत वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस उत्तम लवटे, सखाराम बागल, विक्रमसिंह माने, उत्तम कोकरे, राखी चव्हाण, उषा खोत, रविंद्र भालेराव, सुनिल शिंदे, मारुती शिरगुर, रामभाऊ कोळी, गणेश खडतरे,उत्तरेश्वर माळी, सुनिल ननवरे, घाडगे, सिद्धनाथ भंडारे, आवेश करकमकर व बाभुळगाव केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. यासाठी विस्तार अधिकारी राजाराम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उत्तम लवटे यांनी मार्गदर्शन केले.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




