पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 9 August 2017
सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांबरोबरच पंढरपूर नगरपरिषदेमधील कर्मचारी दि.९ ऑगस्ट रोजी एक दिवसाच्या सामुहिक रजेवर
महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषद कर्मचा–यांच्या विविध मागण्यांबाबत व नगरपरिषद कर्मचा–यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आज संपुर्ण महाराष्ट्रात १ दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने १ दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळूजकर, अध्यक्ष महादेव अदापुरे, नानासो वाघमारे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषद/नगरपंचायत मधील कर्मचा–यांना सातवा वेतन आयोग लागू करावा.अनुकंप व वारसा हक्काची विना शर्ती अटी भरती चालू करावी रोजंदारी व ठेकेदारी कर्मचा–यांना समान काम समान वेतनप्रमाणे वेतन मिळावे व त्यांना सेवेत कायम करावे.ग्रामपंचायचीचे नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या सर्व नगरपरिषदां मधील सर्व कर्मचा–यांचे विना अट विना शर्त पुर्वीप्रमाणेच त्या–त्या पदावर समावेशन करावे व नगरपरिषद कर्मचा–यांना २४ वर्षची कालबद्द लागू करावी व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/ नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी सफाई कामगार रोजंदारी कर्मचारी मुख्याधिकारी संघटनेच्यावतीने आज दि.९ ऑगस्ट २०१७ रोजी या क्रांतीदिा दिवशी १ दिवसाचे सामुदायिक रजा काम बंद आंदोलन करणेत आले.शासनाने नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दि.१० ऑगस्ट ते दि.१४ ऑगस्ट २०१७ रोजी काळ्या फिती लावून काम करणार असुन दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्ह्यातील पालकमंत्री,खासदार,आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे व दि.२१ ऑगस्ट २०१७ रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेणेत आला असल्याची माहिती राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी दिली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेचे कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, नानासो वाघमारे, शरद कुलकर्णी, शरद वाघमारे, सुनिल बोडके, प्रतिम येळे, तानाजी आधटराव, अविनाश शिंदे, धनंजय वाघमारे, दत्तात्रय चंदनशिवे, महावीर कांबळे, गुरु दोडिया, किशोर खिलारे, जिजाबाई शिंदे, गोदा जाधव, सुलभा आंबरे व मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
सुनिल वाळुजकर (जनरल सेक्रेटरी)
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



