👁 6 Views

विधी सहाय्यता केंद्रामार्फत ज्येष्ठ नागरीकांना मदत व सल्ला देणार जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 

पंढरपूर, दि. 11 :- जेष्ठ नागरीकांना येणा-या समस्या दूर करण्यासाठी विधी स्वयंसेवक
आणि विधी सहाय्यता केंद्रामार्फत आवश्यक मदत व सल्ला दिला जाईल असे प्रतिपादन जिल्हा
न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, व विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती पंढरपूर यांच्या संयुक्त
विद्यमाने जेष्ठ नागरीकांच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश
डी.यु.रजपुत, न्यायाधिश एस.सी.बाविस्कर, सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, विठ्ठल-
रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास
अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद गजाधने, सहायक सरकारी
अभियोक्त सारंग वांगीकर, विधी सेवा संघटनेचे अध्यक्ष अलताफ शहानूरकर उपस्थित होते.
न्यायाधिश पी.आर.देशमुख म्हणाले की, जेष्ठ नागरीकांसाठी शासनाच्या वतीने विविध
योजना राबविण्यात येतात त्यामध्ये पेन्शन, आरोग्य, निवास, सुरक्षा विषयक समस्यांची सोडवूणक
करणे आवश्यक असून, यासाठी विधी सेवा समिती मार्फत आवश्यक सल्ला व मदत करण्यात
येईल.
ज्येष्ठ नागरिकांचे योगदान समाजासाठी मोठे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ला एकटे समजू
नये. त्यांच्या समवेत समाज, सामाजिक संस्था, शासन आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या अनुभवाचा
लाभ समाजाला करुन द्यावा असे मत न्यायाधीश एस.सी. बावीसकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, पोलीस विभागामार्फत जेष्ठ
नागरीकांसाठी सुरक्षतेची काळजी घेण्याबरोबरच पोलीस जेष्ठ नागरीकांवर मैत्रीपुर्ण संबंध
ठेवतील.यावेळी जेष्ठ नागरीकांसाठी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची
माहिती तहसिलदार बर्गे यांनी दिली. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत जेष्ठ
नागरीकांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती गटविकास अधिकारी घुगे यांनी दिली.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *