👁 9 Views

मंगळवेढ्यातील गुटखा प्रकरण….ताब्यात घेतलेल्या मालापैकी 4 लाख 90 हजाराचा गुटखा पोलिसांनीच चोरून विकला..!! पोलिस अधिक्षकांकडे तक्रार ..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 12  August 2017

 काल रात्री मंगळवेढा पोलिसानी अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेला गुटखा पकडला होता. येथील  पोलिस  अधिकारी  आणि  कर्मचार्‍यांनीच यातील काही  गुटखा संगनमताने चोरून  विकल्याचा आरोप  पांडूरंग काळे सह दोघांनी केला असून याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे.

15 लाख रूपयांच्या पकडलेल्या गुटख्या मधून 4 लाख 90 हजारांच्या गुटख्याची पोलिस स्टेशन मधुन पोलिसांनीच चोरी करून विकल्याचा  आरोप गुटखा मालकाने केला आहे.

गुटखा विक्री करणारे पांडूरंग काळे, संभाजी बन्ने, गणेश पाटील यांनी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करत संबधीत पोलिसांवर चौकशी करुन  कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 या आधी सुद्धा याच पोलीस स्टेशनचा एक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी गुटखा सोडून दिला होता,त्यामुळे ते निलंबित झाले आहेत, आता पुन्हा असा प्रकार घडल्याने मंगळवेढा परिसरात पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत साशंकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *