पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
Android Application
पंढरपूर (प्रतिनिधी) : उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भुवैकुंठ पंढरी नगरी (पंढरपूर) चा समावेश केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ‘रामायण सर्किट’मध्ये समावेश केला आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून पंढरपूरला अध्यात्माबरोबरच पर्यटन स्थळ करण्याकडे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा कल राहणार आहे. पंढरपूर शहराची महती विचारात घेता केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांना पंढरपूरचे निमंत्रण देऊन त्यांची पंढरपुरात बैठक लावावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे पंढरपूर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी नवी दिल्ली येथे भेटून केली आहे.
पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे अध्यात्मिक शहर आहे. या शहरात वर्षाकाठी सुमारे 80 ते 90 लाख भाविक ये-जा करतात. या संपूर्ण भाविकांची नागरी सुविधांची जबाबदारी पंढरपूर नगरपरिषदेवर पडते. पंढरपूर नगरपरिषदेची ताकद या संपूर्ण नागरी सुविधा पुरविण्याबाबत कमी पडते. तरीही जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पंढरपूर नगरपालिका या भाविकांना आवश्यक असणार्या सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न करते.
दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या प्रमुख चार यात्रांबरोबर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला तसेच दुसर्या व चौथ्या शनिवारला लागून आलेल्या रविवारी मोठ्या प्रमाणात पंढरपुरात भाविक गर्दी करतात. या भाविकांना आवश्यक असणारे पिण्याचे स्वच्छ पाणी, वाहनतळे, नागरी सुविधा, मोठ्या प्रमाणात शौचालयांची उपलब्धता या बाबींबरोबरच पंढरपुरात भाविकांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या उपाययोजना करता येऊ शकतात. यासाठीच केंद्र सरकारच्या ‘रामायण सर्किट’मध्ये पंढरपूर शहराचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांना व्हावी. तसेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन त्यांना व्हावे आणि ‘रामायण सर्किट’चा आराखडा तयार करत असताना पंढरपूरमध्ये नव्याने भाविकांसाठी कोणकोणत्या योजना राबविता येतील, याबाबतची सविस्तर माहिती त्यांना प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये मिळावी, यासाठी ना. डॉ. महेश शर्मा यांना पंढरपूरमध्ये ‘रामायण सर्किट’च्या प्रस्तावाबाबत बैठक घेण्यासाठी विनंती करावी.
ही बैठक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष या नात्याने आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांना पंढरपूर शहर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी नवी दिल्ली येथे भेटून केली. त्यावर खा. दानवे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांना पंढरपुरात बैठक घेण्याबाबतचे पत्र दिले आहे. यावेळी वाईकर यांच्यासोबत सोलापूर जिल्हा कृषी आत्मा कमिटीचे सदस्य राजकुमार पाटील उपस्थित होते.
याबाबतचे निवेदन ही मागणी लोकसभेत करणारे शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व सोलापूर-पंढरपूरचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांना दिले.
फोटो ओळी : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पंढरपूर शहराचा समावेश ‘रामायण सर्किट’मध्ये केला आहे. या रामायण सर्किटच्या माध्यमातून पंढरपूर शहरात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी केंद्र सरकार देणार आहे. या सर्व निधीचा विनियोग खर्या अर्थाने भाविकांसाठी व्हावा, याकरीता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण आपल्या अध्यक्षतेखाली पंढरपुरात केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांची बैठक लावावी, ही आग्रही मागणी खा. दानवे-पाटील यांच्याकडे करताना पंढरपूर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर. सोबत सोलापूर जिल्हा कृषी आत्मा कमिटीचे सदस्य राजकुमार पाटील.


