👁 11 Views

खळबळजनक! श्रीविठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण..

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 14  August 2017

श्रीविठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण..

श्रीविठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक विलास महाजन यांना आज रात्री बेदम मारहाण झाली असून

रक्त बंबाळ अवस्थेत महाजन पंढरपूर  शहर  पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले होते. सध्या
त्यांचेवर वैद्यकीय ऊपचार सुरू असून संगीतराव नामक इसमाने त्यांचेवर हल्ला केल्याची प्राथमीक माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

महाजन यांचे जवळच्या असणाऱ्या संगीतराव यानेच त्यांचेवर हल्ला केल्याची प्राथमीक माहिती समजतेय.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चे व्यवस्थापक विलास महाजन हे रात्री साडेअकरा वाजणेच्या दरम्यान घरी  जात असताना त्यांच्या बाईकला जोराची धडक देउन प्रथम त्यांना जखमी केले. नंतर मारहाण केली. दर्शनासाठी वशिल्याने लोक सोडण्याच्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

अद्याप पोलीसांत गुन्हा दाखल नाही….
त्यांचेवर उपचार झालेनंतरच शहर पोलीस ठाण्यात संबंधीत आरोपीवर  गुन्हा नोंदविण्यात येईल. अशी माहिती  पंढरपूर LIVE ला शहर पोलीस ठाणेकडून मिळाली आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *