👁 5 Views

पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसतोय..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399


mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017

    सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री (शनिवार)पासून सततधार पाऊस सुरू आहे. सोलापूर, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा आदी सर्वच तालुक्यात पाऊस कोसळत माढा तालुक्यातील माढासह टेंभुर्णी परिसरात रात्रभर भिज पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
    रात्री दहा पासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी दिवसभर ढग दाटून आले. परंतु नेहमीप्रमाणे पाऊस आलाच नाही मात्र, रात्रीपासून सकाळपर्यंत संततधार सुरु आहे. या पावसाने जमिनीत चांगली ओल झाली असून उभ्या पिकास चांगला लाभ होणार आहे.
    पंढरपूर तालुका, माळशिरस तालुका, मोहोळ तालुका, बार्शी तालुक्यासह सर्वच तालुक्यात या पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.

    पंढरपूर तालुक्यात बरसले मेघ…
    पंढरपूर तालुक्यात या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाने पाठ फिरवलेली होती. ढग दाटून येत होते पण बरसत नव्हते. काल रात्री 11 वाजल्यापासून मेघांनी बरसायला सुरूवात केली. अद्याप रिमझिम सुरूच आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पावसाने दडी मारल्यामुळे अद्याप पेरण्याही केलेल्या नाहीत. त्यांचेसाठी हा पाऊस दिलासा देणारा आहे. पंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे

    मंगळवेढ्यात दक्षिण, पश्चिम भागात भीज पावसाने दिलासा
    बरेच दिवस ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या बळीराजास शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या भीज पावसाने दिलासा दिला. रविवारी सकाळी आठ पर्यंत संततधार सुरूच असुन मागास खरीपाच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे.
    सलगर, निंबोनी, बावची, जित्ती, पाठखळ, भाळवनी, हाजापुर, हिवरगाव, तळसंगी, नंदेश्वर, भोसे, हुन्नूर, महमदाबादसह परिसरात संततधार सुरू असून पश्चिम भागात आंधळगाव, गणेशवाडी, अकोला, शेलेवाडी, मारापुर, घरनिकी, गुंजेगाव लेंडवे, चिंचाळे या परिसरात पाऊस सुरू आहे.
    या भागातील पिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. दरम्यान शहर शिवारातील सूर्यफुल आणि तुरची अगप पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. योग्य वेळी पावसाने दड़ी मारल्याने पीके जळून गेली आहेत.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *