👁 5 Views

अन चक्क खून प्रकरणात त्याने केला पोलीस अधिकार्‍याच्या कारचा वापर ……

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017 

    पाेलीस नाईक भोसले याच्या पोलीस कोठडीत वाढ …!

    मंगळवेढा /प्रतिनिधी मावसभावाच्या खून करून ते प्रेत नगर जिल्ह्यात नेण्यासाठी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या स्विफ्ट कारचा वापर आरोपी तथा पोलीस नाईक दत्तात्रय भोसले यांनी केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने कर्जत पोलीसांनी मंगळवेढ्यात येवून ती स्विफ्ट कार जप्त केली आहे. पोलीस अधिकार्‍याची खून प्रकरणात कार वापरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, भोसले याच्या पोलीस कोठडीत कर्जत न्यायालयाने दि.22 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

    मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक दत्तात्रय भोसले याने वायफळ (ता.जत) येथील मावसभाऊ नितीन यादव (वय 33) याचा खून केला होता. मावसभाऊ पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी आल्यानंतर तो गावाकडे परत ट्रॅक्टरमधून जात असताना पाठखळ ते घेरडीपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला आपल्या कार गाडीत बसविण्यास भाग पाडले. यादरम्यान, भोसले याचा संगेवाडी येथील दुसरा मावसभाऊ राजू पाटील असे तिघेजण सांगोल्याकडे गेले. संगेवाडी परिसरात आल्यानंतर नितीन याचा दोघांनी रूमालाने गळा आवळून खून केला व त्याचे प्रेत गाडीतून नगर जिल्ह्यात एका अज्ञातस्थळी फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. घटनेनंतर दुसरा आरोपी राजू पाटील हा फरार झाला आहे. पोलीसांनी चौकशीदरम्यान दत्तात्रय भोसले याला पोलीसी खाक्या दाखवताच पोपटासारखा तो मिटूमिटू बोलू लागला. यादरम्यान, आपल्या घरात तीन पिस्तुलेही ठेवल्याचे सांगितले. तदनंतर तपासिक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांचेशी संपर्क साधत पिस्तुलाबाबत माहिती दिली. मयताचा मृतदेह वाहून नेण्यासाठी मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके यांच्या एम.एच-13-3011 स्विफ्ट कारचा वापर केल्याचे तपासात उघड झाल्याने कर्जत पोलीसांनी मंगळवेढ्यात येवून ती कार जप्त केली आहे. खून प्रकरणामध्ये कर्जत पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केल्याने या खून प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी भोसले याला मयताच्या खिशातील मोबाईलचा मोह आवरला नाही. त्याने तो मोबाईल आपल्या घरी आणून ठेवला व या खून प्रकरणाचा लोकेशनवरून उलगडा झाला. आरोपी घटना करीत असताना कांहीतरी पुरावा पाठीमागे ठेवतो असे म्हटले जाते त्याप्रमाणे भोसले पोलीस खात्यात असूनही त्यांनी मोबाईलचा पुरावा आपल्याजवळ ठेवल्यानेच या खून प्रकरणाला वाचा फुटल्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, पोलीसाच्या अंगावर खाकी वर्दी असल्यामुळे जनतेचा पोलीसांवर विश्‍वास असतो. आरोपी भोसले याने खून प्रकरण व पिस्तुलचोरी प्रकरण केल्यामुळे जनतेने नेमका विश्‍वास कोणावर ठेवायचा असा प्रश्‍न या घटनेवरून पडला आहे. या खून व पिस्तुल चोरी प्रकरणामुळे मंगळवेढा पोलीसांची प्रतिमा मलिन झाली आहे. मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी यापुढे पोलीसांना अग्निपरीक्षा पार पाडावी लागणार आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *